शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला

0

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Osmanabad news : 

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलेले काही प्रमुख मुद्दे :

• शिवसैनिकांवर दडपण वाढेल असं बोलणार नाही.

• धनुष्यबाण हा शिवसेनेचा आहे नि शिवसेनेचाच राहील!

• एका गोष्टीचा नक्की अभिमान होता आणि आहे, शिवसेनेने आज पर्यंत राजकीय पार्श्वभूमी आहे की नाही याचा विचार न करता साध्या साध्या माणसांना मोठं केलं.

• ज्यांना या साध्या माणसांच्या मेहनतीने मोठेपण मिळालं, मोठी झाली ती माणसं गेली. ज्यांनी यांना मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं आज ही शिवसेनेसोबत आहेत. ही जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला कोणीही धोका पोहचवू शकत नाही. 

• आमदार जाऊ शकतो पक्ष जाऊ शकत नाही. अनेक संभ्रम निर्माण केले जात आहे जनतेने आणि शिवसैनिकांनी अजिबात या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका.

• जे आमदार माझ्या सोबत राहिले त्यांचे मी जाहीर कौतुक करतो... काही वाट्टेल ते होवो आम्ही नाही हटणार, या जिगरीची माणसं जिथे असतात तिथेच विजय असतो!

• न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. न्याय मंदिरावर विश्वास आहे...

• शिवसेनेचे काही वाकडं होऊ न देण्याची ताकद आजही शिवसैनिकांच्या मनगटात आहे.

• ११ जुलैची सुनावणी देशाच्या लोकशाहीचं भवितव्य ठरवणार आहे.

• मी यापूर्वीही आव्हान केले होते, सुरतेला जाऊन बोलण्यापेक्षा, इथेच 'सुरत' दाखवून बोलायचे होते.

• ज्यांनी ठाकरे कुटुंबीयांचा अपमान केला, अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसताहात, आता लोकांना कळेल तुमचं प्रेम खरे की खोटे!

• मला सर्वसामान्य लोकांना धन्यवाद द्यायचे आहेत. मेसेज करून, फोन करून ते आपला पाठींबा दर्शवत आहेत.

• विधानसभेच्या निवडणुका व्हायला हव्यात, आम्ही चूक केली असेल तर जनतेचा निर्णय शिरसावंद्य आहे!

• सन्मानाने बोलवावं तर यापूर्वीही आवाहन  केलेलं आहे. आमच्याबद्दलच प्रेम हे अडीच वर्ष कुठे गेले होते. जे आमच्याशी अत्यंत वाईट पद्धतीने वागले त्यांना मिठ्या मारताना तुम्हाला आनंद वाटत असेल तर, तुमचा आनंद तुम्हाला लखलाभ असो. प्रतिपादन यावेळी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top