चोरीच्या स्कॉर्पीओसह तिघे ताब्यात तुळजापूर पोलिसांची कारवाई
( Osmanabad : tuljapur police )
तुळजापूर पोलीस ठाणे : अवैध धंद्यावर जरब बसावा यासाठी तुळजापूर पो.ठा. चे पोनि- श्री. अजिनाथ काशीद यांसह पथक दि. 24 जुलै रोजी शहरात गस्तीस होते. दरम्यान 13.30 वा. सु. तुळजापूरातील डुल्या मारुती मंदीराजळ एक स्कॉर्पीओ क्र. एम.एच. 14 बीएक्स 9764 ही पथकास दिसली. यावर पथकाने स्कॉर्पीओ जवळ जाउन पाहिले असता कारमधील तीघेही तरुण स्कॉर्पीओमधुन उतरुन पळू लागले. पथकाने लागलीच त्यांचा पाठलाग करुन त्या तीघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांची नावे 1)जितसिंग राजपालसिंग टाक, रा. हटपसर, जि. पुणे 2)लकिसिंग गब्बरसिंग टाक, रा. येवत, ता. दौंड, जि. पुणे असे असून तीसरा तरुण हा अल्पवयीन (विधी संघर्षग्रस्त बालक) असल्याचे समजले. पोलीसांनी स्कॉर्पीओ वाहनाची तपासणी केली असता कारमध्ये धारदार तलवार-1, धारदार कुकऱ्या- 2, लोखंडी कटर- 1, मारतुल- 2, लोखंडी कटावण्या- 2, स्मार्टफोन- 3 व एक बॅग असे साहित्य आढळले. यावर ते तीघे मालाविषयी गुन्हे करण्याच्या तयारीत असल्याची पोलीसांची खात्री पटली. पोलीसांनी त्यांना स्कॉर्पीओच्या मालकी- हक्काविषयी चौकशी केली असता ते टाळू लागल्याने पोलीसांनी तांत्रीक माहिती घेतली असता ती स्कॉर्पीओ पुणे जिल्ह्यातील भिगवन पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेली असल्याने गुन्हा दाखल असल्याचे समजले. यावर पोलीसांनी स्कॉर्पीओसह आतील नमूद साहित्य असा एकुण अंदाजे 3,58,700 ₹ चा माल जप्त करुन नमूद तीघांना ताब्यात घेतले. यावरुन तुळजापूर पो.ठा. पोलीस अंमलदार- सचिन राउत यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तिघांविरुध्द तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 270/2022 हा भा.दं.सं. कलम- 401 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 124 व शस्त्र कायदा कलम- 4,25 अंतर्गत नोंदवला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन तुळजापूर उपविभागाचे पोलीस उपअघीक्षक- श्रीमती सई भोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर पो.ठा. चे पोनि- श्री. अजिनाथ काशीद, सपोनि- चासकर, पोउपनि- श्रीमती पवार, चनशेट्टी, पोहेकॉ- यादव, पोना- भागवत, देशमुख, माळी, घरबुडवे, पोकॉ- सावरे यांच्या पथकाने केली आहे.