जिल्हयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शासकीय वसतीगृहातील प्रवेश विहीत मुदतीत निश्चित करण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.06(जिमाका):सामा
शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन अर्ज 15 जुलै 2022 पर्यंतची मुदत असेल .पहिली निवड यादी अंतिमकरून 18 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येईल.पहिल्या निवड यादीनुसार 25 जुलैही प्रवेशाची अंतिम मुदत राहील. तसेच रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 27 जुलै रोजी प्रसिध्द केली जाणार आहे दुसऱ्या यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 05 ऑगस्ट पर्यंत प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच 10 ऑगस्ट रोजी पहिल्या आणि दुसऱ्या निवड यादीवरील रिक्त असलेल्या जागांवर स्पॉटॲडमिशन देण्यात येतील.
इयत्ता अकरावी आणि अकरावीच्या नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून)ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत 30 जुलै 2022 पर्यंत असेल .पहिली निवड यादी अंतिमकरून 5 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येईल.पहिल्या निवड यादीनुसार 14 ऑगस्टही प्रवेशाची अंतिम मुदत राहील तसेच रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 17 ऑगस्ट रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. दुसऱ्या यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 27 ऑगस्ट पर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी पहिल्या आणि दुसऱ्या निवड यादीवरील रिक्त असलेल्या जागांवर स्पॉटॲडमिशन देण्यात येईल.
बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका, पदवी आणिएम.ए, एम.कॉम, एम.एस.सी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर,पदविका, पदवी इत्यादी अभ्यासक्रम (व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून)ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत 27 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल .पहिली निवड यादी अंतिमकरून 31 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येईल.पहिल्या निवड यादीनुसार 10 सप्टेंबरही प्रवेशाची अंतिम मुदत राहील. तसेच रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 13 सप्टेंबर रोजी प्रसिध्द केली जाणार. दुसऱ्या यादीतल निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 23 सप्टेंबर पर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच 28 ऑक्टोबर रोजी पहिल्या आणि दुसऱ्या निवड यादीवरील रिक्त असलेल्या जागांवर स्पॉटॲडमिशन देण्यात येईल.
व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत 30 सप्टेंबर 2022 पर्यंत असेल .पहिली निवड यादी अंतिमकरून 3 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात येईल.पहिल्या निवड यादीनुसार 13ऑक्टोबर प्रवेशाची अंतिम मुदत राहील. तसेच रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 15ऑक्टोबर रोजी प्रसिध्द केली जाणार. दुसऱ्या यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 25 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच 28 ऑक्टोबर रोजी पहिल्या आणि दुसऱ्या निवड यादीवरील रिक्त असलेल्या जागांवर स्पॉटॲडमिशन देण्यात येईल. मागासवर्गीय मुलांचे आणि मुलींच्या शासकीय वसतीगृहात जिल्ह्यात आठवी ते दहावीच्या 279 जागा रिक्त आहेत. अकरावी आणि बारावीनंतरच्या प्रवेशितांच्या 94, उच्च शिक्षण घेणाऱ्या बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी 101, उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थीसाठी 88 अशा एकूण 562 जागा रिक्त आहेत. तेंव्हा विद्यार्थ्यांनी संबंधित वसतीगृहाच्या गृहपालांकडून अर्ज प्राप्त करावेत आणि परिपूर्ण अर्ज ऑफलाईन पद्धतीने गृहपालांकडे जमा करावेत, असेही आवाहन अरवात यांनी केले आहे.
****