चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी २४ तासांत ताब्यात

0


चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी २४ तासांत ताब्यात.

स्थानिक गुन्हे शाखा : शिवाजीनगर, सांजा रोड, उस्मानाबाद येथील किरण हरिभाउ काकडे यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 2987 ही दि. 03.07.2022 ते दि. 04.07.2022 रोजी दरम्यानच्या रात्री किरण यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. यावरुने किरण काकडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 193/2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत दि. 05 जुलै रोजी नोंदवण्यात आला आहे.

गुन्हा तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- श्री. शैलेश पवार, पोहेकॉ- हुसेन सय्यद, महेबुब अरब, पोना- अमोल चव्हाण, पोकॉ- रवींद्र आरसेवाड यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रेनापुर तांडा, ता. रेनापुर, जि. लातूर येथील ज्ञानेश्वर बालाजी जाधव उर्फ सैराट यांस दि. 05 जुलै रोजी उस्मानाबाद येथील सांजा चौकातून चोरीच्या नमूद मोटारसायकलसह ताब्यात घेउन उर्वरीत कारवाईकामी आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top