तुळजापूर :- अंड्याच्या भावामध्ये आज शेकडा पन्नास रुपये वाढ झाली आहे 5 जुलै रोजी शेकडा 550 रुपये भाव होते मात्र आज शेकडा सहाशे रुपये भाव झाले आहे त्यामुळे एक दिवसात शेकड्यामागे पन्नास रुपये वाढ झाली आहे तर चालू महिन्यामध्ये अंड्यामध्ये शेकडा 100 रुपये वाढ झाली आहे मागील दोन महिन्यांमध्ये साधारण दीडशे रुपयाच्या जवळजवळ अंड्यामध्ये भाव वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
लहान किराणा दुकानात एक अंडा सात रुपये विक्री होत आहे जिल्ह्यात अंड्याचे भाव हैदराबाद मार्केट च्या भावाने काढले जातात तुळजापूर तालुक्यातील इटकळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसायात अंडे उत्पादन होतात. त्याबाबत पोल्ट्री तालुक्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी म्हणाले कोंबड्याच्या खाद्य महाग झाल्याने, पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने अंड्याचे दर वाढले आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी पोल्ट्री फार्म चालकांनी दिली आहे