google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 अवैध गुटखा विरोधी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अवैध गुटखा विरोधी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0



Osmanabad news :- 

स्थानिक गुन्हे शाखा :  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी काल दि. 16 जुलै रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथक कळंब तालुक्यातील डिकसळ येथे आले  असता पथकास गोपनीय माहिती मिळाली की, डिकसळ ग्रामस्थ- किसन माधव गायकवाड, वय 65 वर्षे यांनी आपल्या दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा साठवला आहे. यावर पथकाने किसन गायकवाड यांच्या दुकानात छापा टाकला असता पोत्यांत महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखू असा एकुण 24,240 ₹ किंमतीचा माल बाळगलेले आढळले. यावर पथकाने नमूद माल जप्त करुन किसन गायकवाड यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 328, 272, 272 अंतर्गत कळंब पोलीस ठाण्यात दि. 16 जुलै रोजी 19.48 वा. सु. गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि- श्री. रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ- हुसेन सय्यद, पोना- अमोल चव्हाण, पोकॉ- रविंद्र आरसेवाड, सहाणे यांच्या पथकाने केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top