जुगार विरोधी कारवाई दरम्यान लोहारा पोलीसांची कारवाई

0



Osmanabad news :

लोहारा पोलीस ठाणे : जुगार विरोधी कारवाई दरम्यान लोहारा पोलीस ठाण्याचे पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल दि. 16 जुलै रोजी 20.15 वा. सु. डॉ. आंबेडकर चौक, लोहारा येथील एका शेडवर छापा टाकला. यावेळी तेथे लोहारा ग्रामस्थ- 1)विजय फावडे 2)शोएब सय्यद 3)रहीम खडीवाले 4)जमाल शेख 5)खय्युम हेड्डे 6)अब्दुल इस्माईल हेड्डे 7)सलमान शेख 8)महेबुब हेड्डे हे सर्व लोक ऑनलाईन चक्री गेम किंग नावाचा जुगार चालवण्याच्या साहित्यासह संगणक, 1 भ्रमणध्वनी व 2,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 52,000 ₹ चा माल बाळगलेले पथकास आढळले. यावर पथकाने जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अंतर्गत लोहारा पो.ठा. येथे आज दि. 17 जुलै रोजी रात्री 01.07 वा. गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा पो.ठा. चे प्रभारी सपोनि- काकडे यांच्यासह पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top