फोटोग्राफरच्या वाढदिवसानिमित्त फोटोग्राफर्ससाठी बेंबळी येथे फोटोशॉपची मोफत कार्यशाळा संपन्न......
Osmanabad news :-
आधुनिक काळात बदलणाऱ्या फोटोग्राफीची माहिती ग्रामीण भागातील फोटोग्राफर्स बांधवांना व्हावी म्हणून बेंबळी येथील फोटोग्राफर प्रकाश खापरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून फोटोशॉपचे मोफत प्रशिक्षण आयोजित केले...
उस्मानाबाद जिल्ह्यातील नामांकित फोटो आणि व्हिडिओ एडिटर रमेश मेंढे यांनी उपस्थित फोटोग्राफर्सना विंडोज इलेव्हन 2022 फोटोशॉप सीसी 2022 मध्ये फोटो एडिट कसे करायचे, बॅकग्राऊंड कमी वेळात कसा चेंज करायचा ,वापरावयाचे विविध प्रकारचे फिल्टर आणि फोटोग्राफीचे उपयोगी सर्व टूल्सची माहिती या कार्यशाळेत उपस्थित फोटोग्राफर्सना देण्यात आली
या कार्यशाळेत बेंबळी सह विविध भागातून 53 फोटोग्राफर सहभागी झाले होते ,या कार्यशाळेत मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून फोटोग्राफी व्यवसायात प्रगती व्हावी हाच उद्देश ही कार्यशाळा आयोजित करण्यामागचा उद्देश आहे
या कार्येशाळेत प्रकाश खापरे, संपत वडवले, व्हिडिओ आणि फोटो एडिटर रमेश मेंढे ,मारुती कदम ,बाळासाहेब चव्हाण, यांच्या सह 53 फोटोग्राफर उपस्थित होते