तुळजापुरात एटीएम फोडण्याचे चोरांकडून प्रयत्न सुरूच!

0
तुळजापुरात एटीएम फोडण्याचे चोरांकडून प्रयत्न सुरूच

तुळजापूर {  प्रतिनिधी } :तुळजापूर ( tuljapur city ATM ) शहरातील वरदळीच्या ठिकाणी
 अंधाराचा फायदा घेत चक्क चोरट्याने बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रकार तुळजापूर शहरात घडला आहे शहरात यादी दोन दिवसापूर्वी असाच एक प्रकार झाला होता पुन्हा दिनांक 17 जुलै रोजी चोरट्यांनी त्याच पद्धतीने वेगळ्या एटीएम वर डल्ला मारला परंतु चोरट्यांचा प्लॅन फसला .वेगवेगळ्या ठिकाणी दोन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करून पोलिसांसमोर एक प्रकारचे चोरट्याने आव्हानच केले आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
            याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील नळदृग रोडवरील एसबीआय बँकेची एटीएम असून दिनांक 17 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेबारा ते पावणे एक वाजण्याच्या दरम्यान एसबीआय शाखा तुळजापूर एटीएम नळदृग रोड तुळजापूर येथे कोणीतरी अज्ञात दोन चोरट्याने लोखंडी हातोडा व छन्नी च्या साह्याने एसबीआय बँकेचे शाखेतील या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी बँकेमार्फत कॅश विड्रॉल मशीन ( मशीन नंबर ATM ID NO CFBA020048024) ची सुविधा असलेले मशीन मधील पैसे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला
                 अशा प्रकारची फिर्याद एसबीआय बँकेचे तुळजापूर शाखेची शाखा अधिकारी कल्पेश नारायण घोडके वय 35 वर्ष यांनी दिलेल्या तुळजापूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीवरून दोन चोरट्यांविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 258/2022भादवि कलम 380 511 ,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पल्लवी पवार हे करत आहेत .
             तर याआधी दिनांक 15 जुलै रोजी तुळजापूर शहरातील नळदृग रोडवरील आयडीबीआय बँके येथे चोरट्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता परंतु सदर प्रयत्न चोरट्यांचा फसला .तर तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 256/2022भादवि कलम 380 511 ,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन दिवसात एटीएम वर डल्ला मारण्याचा प्रकार झाल्यामुळे पोलिसांसमोर आरोपीला पकडण्यामध्ये मोठे आव्हान असणार आहे . आरोपीने पोलिसांना चोरी बाबत आवाहन केलं आहे .तुळजापूर पोलीस गुन्हेगारांवर आळा घालण्याचा प्रयत्न करत आहेत .अधिक तपास पोलीस करत आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top