सनराईज स्कूल आणि ज्युनियर कॉलेज शेळगाव या प्रशालेत वृक्षारोपण

0

सनराईज स्कूल आणि ज्युनियर कॉलेज शेळगाव या प्रशालेत वृक्षारोपण..

परंडा

शेळगाव : परंडा तालुक्यातील  सनराईज शेळगाव येथील सनराईज स्कुल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये शासन आदेशानुसार सन २०२२ च्या पावसाळ्यात करावयाच्या वृक्ष लागवडी बाबत एक विद्यार्थी एक झाड व एक शिक्षक एक झाड याप्रमाणे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आलेले आहे त्यानुसार आज शेळगाव येथील सनराईस स्कूल मध्ये रिकाम्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले हे वृक्षारोपण प्रशालेचे मुख्याध्यापक संभाजी देवकर  व प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक गणेश खरसडे  यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बाळासाहेब जामदारे, प्रकाश शिंदे ,राहुल शिंदे, तानाजी आमटे,सुरेखा दैन,सारीका मोरे , सारीका जमादारे,किर्ती शिंदे यांच्या हस्ते एक शिक्षक एक झाड असे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सूर्यकांत अवताडे,संतोष भिलारे,नितीन मोहिते, पप्पू भोगील यांनी सहकार्य  केले. वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये प्रशालेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top