शिवसेनेच्या वतीने उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील दिव्यांगांना मोफत मोटराइज्ड ट्रायसायकलचे वाटप

0

शिवसेनेच्या वतीने उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील दिव्यांगांना मोफत मोटराइज्ड ट्रायसायकलचे वाटप

 

            भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयभारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व शिवसेनेचे लोकप्रिय खासदार मा. श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार श्री. कैलास घाडगे-पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव व कळंब तालुक्यातील दिव्यांगांना मोफत मोटराइज्ड ट्रायसायकलचे वाटप करण्यात आले. दिवसभरात एकुण 30 दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घेतला.

उस्मानाबाद शहरातील पवनराजे कॉम्प्लेक्स येथील समर्थ मंगल कार्यालयात शनिवारदि. 13 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला धाराशिव व कळंब तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. नोंदणी केलेल्या 30 दिव्यांगांना शिवसेनेचे लोकप्रिय खासदार मा.श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकरआणि शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्या हस्ते मोफत ट्रायसायकल वाटप करण्यात आले.          

 


            पुढील काळात धाराशिव जिल्ह्यात, बार्शी, औसा व निलंगा तालुक्यात देखील दिवयांगाना मोफत उपयोगी आवश्यक वस्तू मिळवून देण्यासाठी तालुका स्तरावर शिबीर आयोजित करून पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केले.

            त्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने येत्या 2  दिवसात साजरा होणाऱ्या देशाच्या अमृतमहोत्सवी दिनाचे औचित्य साधून आज केलेल्या या मोटाराईज ट्राय सायकल वाटपामुळे 30 दिव्यांगांना स्वतंत्र मिळाले.

            व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष श्री. नंदु भैय्या राजेनिंबाळकर, कळंब तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसेशिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणीजिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सस्तेसंग्राम देशमुखप्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडेएआयएमसीओ डॉ.रोहिणी तुकाराम कारंडेऑडियोलॉजिस्ट डॉ. नीरज कुमारश्री. नरसिंग भोसले श्री. विष्णू वैरागड, आमीर भाई शेख, आफरोज पिरजादे, मुजिब भाई शेख, गफुर शेख, किसन भिसे, अजित वाघमारे, गोविंद मुंडे, सागर इंगळे, बाळासाहेब काकडे, भाऊ शिरसाठ, अमोल मुळे, सौदागर जगताप, मुकेश पटील, संतोष डुकरे, सत्यजित पडवळ, साबेर भाई, साजीद शेख, उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

            यावेळी बोलताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणालेशिवसेनेच्या पुढाकारातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांना दिलासा देण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाले आहे. ज्यांना घराच्या बाहेर पडता येत नव्हते त्या बांधवांच्या दैनंदिन जीवनात या ट्रायसायकलमुळे निश्चित बदल होईलअसे सांगितले.

 

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील म्हणाले कीहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणानुसार  जिल्ह्यात शिवसेनेचे कार्य सुरू आहे. या धोरणानुसारच दिव्यांग बांधवाना मोफत ट्रायसायकलचा लाभ मिळवून दिला असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

           

यांनी घेतला ट्रायसायकलचा लाभ

            मोफत ट्रायसायकलचा धाराशिव व कळंब तालुक्यातील 29 दिव्यांग बांधवांना लाभ मिळाला. लाभार्थींची नावे पुढीलप्रमाणे - गणेश बबन शिंदे (कळंब)सचिन भारत पिंपरेअरविंद देवीदास समुद्रे (पाडोळी,ता.कळंब)सादिक इब्राहीम शेख (कळंब)बालाजी मोहन बावणे (हावरगाव),  आप्पाराव साहेबराव समुद्रे (बोरगाव खु.)संगीता काळे (आंदोरा)विष्णू काशीनाथ सुरवसे (रायगव्हाण)संपत प्रभू वाघमारे (शिराढोण)संकेत राजेंद्र वाघमारे (पानगाव,ता.कळंब)प्रमोद बाबुराव साळुंके (घारगाव)प्रकाश शिवाजी गोरे (नायगाव)सदानंद कुंडलिक भांगे (दुधाळवाडी)धनंजय दिलीप कांबळे (सातेफळ)हणमंत महालिंग कुंभार (सकनेवाडी,ता.उस्मानाबाद)धनंजय शिवाजी जाधव (बावी,ता.उस्मानाबाद)चंद्रकला राजाभाऊ लोहार (बेंबळी)सुदाम लक्ष्मण झांबरे (भंडारी)सुनील जयवंत चिलवंते (मेंढा)दत्तात्रय परीट (बामणी)आयाज अब्दुल हलीम मशायकहनमंत ओव्हाळरशीद बशीर शेख(उस्मानाबाद)भैरवनाथ उत्तम गाढवे (ढोकी) व इतर.

 

दिव्यांगांची भव्यदिव्य तिरंगा रॅली

            मोफत ट्रायसायकलचा लाभ घेतलेल्या बांधवांनी धाराशिव शहरातून भव्यदिव्य ट्रायसायकल रॅली काढली होती. पवनराजे कॉम्प्लेक्स येथून निघालेली ही रॅली पोलीस मुख्यालयजिल्हाधिकारी कार्यालयछत्रपती शिवाजी महाराज चौकभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकसंत गाडगेबाबा चौकतांबरी विभागराष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब चौकसांगता करण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top