पोलीस मुख्यालय आवार – परिसरात वृक्षारोपन.”
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यापार्श्वभुमीतून मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या संकलपनेतुन आज दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस मुख्यालय आवार व परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी मा.जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले-डंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच उस्मानाबाद शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद अशा सर्वांनी 1000 वृक्षांची लागवड केली.
यावृक्षारोपन दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी, उस्मानाबाद श्री. घेटे, पोलीस निरीक्षक- श्री जयस्वाल, श्री खनाळ, श्री दसुरकर, श्री पिटे, राखीव पोलीस निरीक्षक- दुबे, सपोनि- श्री बारवकर, श्री पवार, श्री भराटे, पोलीस मुख्यालय येथील पोलीस अंमलदार उपस्थित होते.