पुरावे देऊन पण गुन्हा दाखल होत नसल्यामुळे स्वातंत्र्यदिना दिवशी १५ ऑगस्ट रोजी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे करणार आत्मदहन?

0
पुरावे देऊन पण गुन्हा दाखल होत नसल्यामुळे  स्वातंत्र्यदिना दिवशी 15 ऑगस्ट रोजी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे करणार आत्मदहन?

उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथील प्रकार कारवाईबाबत मौन व्रत?

तुळजापूर प्रतिनिधी :तुळजापूर शहरातील जागा नसलेल्या व्यक्तीच्या नावावर अधिकाऱ्यांशी संगणमत करून जागा ब्लेडच्या साह्याने पी आर कार्डवर खडाखोड करून शासकीय कागदोपत्री खोट्या नोंदी करून कार्यालयास पुरावे देऊन पण कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे तक्रारदार  व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल न केल्यामुळे उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या जाचास कंटाळून तक्रारदार राहुल कोळी हे 15 ऑगस्ट रोजी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय समोर  आत्मदहन करणार असल्याचं जिल्हाधिकारी यांना दिनांक 10 ऑगस्ट रोजी  सदर निवेदनाद्वारे सदर मागणी केली आहे  .
             सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की तुळजापूर शहरातील घरजागेचे बनावट कबाला दाखवून उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे तत्कालीन अधिकारी  यांच्याशी संगणमत करून पी आर कार्डवर जागा नसलेल्या व्यक्तीच्या नावावर जागा असल्याचे दाखवून ब्लेड सहाय्याने खऱ्या पी आर कार्डवर खाडाखोड करून जागा नसलेल्या व्यक्तीचे नाव टाकून बनावट टोच नकाशा वर जागा असल्याचे भासवून बनावट नोंदी करून नगरपरिषद तुळजापूर यांच्याकडे नामांतरण करण्यासाठी अर्ज दाखल करून नामांतरण करून घेतले . तसेच तहसील कार्यालयचा बनावट काबाला दाखवून तहसील कार्यालय तुळजापूर,उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर,व नगरपरिषद कार्यालय तुळजापूर   व तक्रारदार सर्वांची फसवणूक केली आहे .यासंदर्भात संबंधित व्यक्ती व उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथील तत्कालीन अधिकारी या सर्वांनी संगणमत करून  बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केली आहे अशा  तत्कालीन अधिकारी  व संबंधित व्यक्तीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी दीड वर्षापासून तक्रारदार येणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हाअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांना अनेक वेळेस पत्रव्यवहार करून संबंधित फसवणूक संदर्भात पुरावे उपलब्ध करून देऊन पण जाणीवपूर्वक कारवाई होत नसल्यामुळे तत्कालीन अधिकारी व संबंधित व्यक्तीस अधिकारी वर्ग पाठीशी घालत असल्यामुळे या सर्वांना  जाचास कंटाळून गुन्हे न दाखल झाल्यामुळे स्वातंत्र्य दिना दिवशी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे आत्मदहन करत असल्याचं तक्रारदार राहुल कोळी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हणले आहे . या निवेदनावर राहुल कोळी यांची स्वाक्षरी आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top