शहरात आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध ,कलम १४४ लागू

0

शहरात आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध ,कलम १४४ लागू

 

उस्मानाबाद.दि,12(जिमाकास्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या  हस्ते दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणात होणार आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमा दिवशी विविध मागण्या संदर्भात लोक संघटनापक्षकार्यकर्ते हे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणधरणेमोर्चारॅलीअशा कार्यक्रमांचे आयोजन करतात. 


त्याअनुषंगाने उस्मानाबाद शहरातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते सर्कीट हाऊसशिंगोली पर्यंत दिनांक १४ ऑगस्ट २०२२ चे ००.०० वाजल्यापासून ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ च्या २४.०० वाजेपर्यंत आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध असून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ येथील उपविभागीय दंडाधिकारी योगेश भिमराव खरमाटे यांनी लागू केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top