श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

0



श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद..

उस्मानाबाद : लोकनेते आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून व जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने विविध गटांसाठी श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन प्रतिष्ठान भवन येथे करण्यात आले होते.


 या स्पर्धेला विविध जाती धर्मातून उदंड प्रतिसाद मिळाला. सदरील स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी नेताजी पाटीलमहिला जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरेभाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकरजिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीकृष्णाच्या वेशभूषा च्या माध्यमातून ख-या अर्थाने सत्याच्या पाठीशी कृष्णा सारखे उभे राहणे आवश्यक आहे.


 अविवेकी संख्येने कितीही जास्त असले तरी शेवटी विजय सत्याचाच होतो असे प्रतिपादन नितीन काळे यांनी केले. सुरुवातीला कार्यक्रमाचे संयोजक युवराज नळे यांनी प्रास्ताविक करताना या स्पर्धेत सहभागी झालेल्या हिंदूमुस्लिम अशा विविध जाती धर्मातील विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल अभिनंदन करूनस्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी आवर्जून आलेल्या दमयंती साळवीदीपा गायकवाडवर्षा नळेज्योती महामुनी या परिक्षकांचा सत्कार करण्यात आला.


 प्राथमिक विद्यार्थी गटमाध्यमिक विद्यार्थी गट व खुला गट अशा एकूण तीन विविध गटामध्ये स्पर्धा पार पडल्या.  सर्व स्पर्धक विजेत्यांना आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते रोख रक्कमप्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे व इतर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असेही युवराज नळे यांनी घोषित केले.


  कार्यक्रम संयोजन समितीचे ओम नाईकवाडी व प्रीतम मुंडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी प्रविण पाठकसंदिप कोकाटेहिंमत भोसलेसचीन लोंढेराजाभाऊ कारंडेजगदीश जोशीदेवकन्या गाडेविद्या मानेश्रीराम मुंबरेराज निकमइत्यादी सह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top