माकणी निम्न तेरणा प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडले ;तेरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

0
माकणी निम्न तेरणा प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडले ;तेरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू


लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात काल मंगळवारी दि.30 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा ओघ झपाट्याने वाढत असल्याने दि.31 ऑगस्ट 2022 रोजी  सकाळी 10:30 वाजता 4 दरवाजे 0.10 मिटर उंचीने उघडण्यात असून तेरणा नदीपात्रात 43.328 घमी/सेकंदने (1530.11 घनफूट/सेकंद) विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
  नदिकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा प्रकल्प पुर्ण क्षमतेनी भरला असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top