उस्मानाबाद-आम आदमी पार्टीचा दणका - तक्रारीनंतर ३ मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने निलंबित, इतरांवर सुद्धा कारवाईची टांगती तलवार

0

उस्मानाबाद-आम आदमी पार्टीचा दणका - तक्रारीनंतर 3 मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने निलंबित, इतरांवर सुद्धा कारवाईची टांगती तलवार

उस्मानाबाद शहरातील 3 मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असून आम आदमी पार्टीने केलेल्या तक्रारीनंतर तात्काळ ही कारवाई करणाऱ्यात आली आहे तर इतरांवर सुद्धा कारवाईची टांगती तलवार उभी आहे. शहरातील स्टॅम्प व कोर्ट फीस स्टॅम्प हे काही मुद्रांक विक्रेते सर्रास जादा दराने विक्री करीत आहेत तर काही जण विनापरवाना विक्री करीत आहेत स्टॅम्प विक्री करण्यासाठी दिलेल्या नियमांचा भंग होत असल्याने त्याची तक्रार आम आदमी पार्टीने केली आहे त्यामुळे त्याची चौकशी करुन कारवाई केली जाणार आहे.

उस्मानाबाद जिल्हा मुद्रांक अधिकारी यांनी न्यायालय परिसराच्या लगतच न्यायालयात तिकीट व सटॅम्प विक्री करण्याकरिता लायससान्स धारक स्टॅम्प विक्रेत्यांच्या नेमनुका केलेल्या आहेत जिल्हा न्यायालय उस्मानाबादच्या आवारामध्ये सर्व सामान्य पक्षकारांना व वकील मंडळींना स्टॅम्प तिकीटाची व्यवस्था  धारकाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत व त्यांनी कोर्ट परीसरामध्ये बसून स्टॅम्पच तिकीटे विक्री करणे गरजेचे आहे . न्यायालयासाठी नियुक्त केलेला एकही स्टॅम्प विक्रेता न्यायालय परीसरामध्ये बसून मागील दोन वर्षा पासून विक्री करत नाही त्यामुळे वकीलांना व पक्षकारांना न्यायालयातील प्रकरणासाठी आवश्यक असणारे तिकीट व स्टॅम्प बाहेरून आणावे लागत आहेत एवढेच नाहीतर न्यायालयाच्या दक्षिण गेट ला बांगड व इतर स्टॅम्प विक्रेते हे १० रुपयाचे तिकीट १२ रुपये दाराने विक्री करतात . त्याचप्रमाणे १०० रुपयेचे स्टॅम्प वर १० रुपये अतिरीक्त पैशाची सर्व सामान्य लोकाकडुन व वकीलांकडून घेतले जातात त्याचप्रमाणे न्यायालयात आवश्यक चलन काढत असताना सुध्दा जादा रक्कमेची मागणी करतात पक्षकार , सर्वसामान्य नागरीक व वकील यांची मोठ्याप्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत असुन संबधीत लायसन्धारकाची तात्काळ चौकशी लावावी व संबंधीताचे लायसन्स रद्द करून न्यायालय परिसरामध्ये नियमीतपणे बसणाऱ्या लायसन्स धारकांना नियुक्त करावे . सदरील कारवाई १० दिवसाचे आत नाही केल्यास आम आदमी पार्टी करणाऱ्या लायसन्स धारकांचे लायसन रद्द करुण कार्यवाही करण्याबाबत चे निवेदन जिल्हा मुद्रांक अधिकारी यांना देण्यात आले आहे यावेळी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अजित खोत,विकास वाघमारे,मोसीन मिरझा, नामदेव वाघमारे, बिलाल रिजवी,महेबूब शेख,गणेश कांबळे,कृपाळसिंह डाकुरे आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top