अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
उस्मानाबाद.दि.01 (जिमाका):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले-डंबे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोडभरले शाम, तहसीलदार प्रवीण पांडे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, श्रीमती अर्चना मैंदर्गी, अव्वल कारकून नरसिंह ढवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
*****