उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई
अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 16 ऑगस्ट रोजी 6 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यातील देशी दारुच्या 62 बाटल्या, 102 लि. गावठी दारु जप्त केली. या जप्त केलेल्या एकुण मद्याची अंदाजे किंमत 18,140 ₹ असून छाप्यादरम्यान संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.
1) मुरुम पो.ठा. च्या पथकाने तीन ठिकाणी छापे टाकले असता यात मुरुम ग्रामस्थ- हरी वाघमारे हे 15.30 वा. सु. आपल्या घरासमोर 10 लि. गावठी दारु बाळगलेले तर नाईकनगर तांडा ग्रामस्थ- वसंत राठोड हे 17.30 वा. सु. आपल्या घरासमोर 15 लि. गावठी दारु बाळगलेले तसेच कोराळ ग्रामस्थ- बाबु सुरवसे हे 17.50 वा. सु. आपल्या घरासमोरील शेडमध्ये 22 लि. गावठी दारु व 5 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.
2) उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या पथकाने दाळींब येथे छापा टाकला असता ग्रामस्थ- गंगाराम सातपुते हे 18.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर 50 लि. गावठी दारु व 17 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.
3) वाशी पो.ठा. च्या पथकाने निपाणी, ता. भुम येथे छापा टाकला असता अतुल कोकाटे हे गावातील शिवराज हॉटेलमध्ये 40 बाटल्या देशी- विदेशी दारु बाळगलेले असताना आढळले.
4) परंडा पो.ठा. च्या पथकाने टाकळी, ता. परंडा येथे छापा टाकला असता ग्रामस्थ- पिंट्या पवार हे 11.00 वा. सु. गावातील आरणगाव रस्त्याकडेला 5 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.