वीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना पोलीस नाईकास लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले

0

वीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना पोलीस नाईकास लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले

उस्मानाबाद :- तक्रारदार यांचे विरुद्ध पोलीस ठाणे लोहारा येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक न करणे, लॉकअप मध्ये न टाकणे, चार्जशीट न पाठवणे व फायनल पाठवणे यासाठी लोकसेवक गोरोबा बाबासाहेब इंगळे , ( वय 35 वर्षे) पोलीस नाईक /1247, पोलीस स्टेशन लोहारा, ज़िल्हा उस्मानाबाद (वर्ग-3) तक्रारदार यांच्याकडे  दिनांक 03.08.2022 रोजी 25000/- रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडी अंती 20,000/- रुपयांची मागणी करून दिनांक 04.08.2022रोजी  20,000/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली आहे. 

रक्कम स्वीकारताना उस्मानाबाद लार्ज लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. हि कारवाई लोहारा ते जेवळी रोडवर एच पी पेट्रोल पंपाजवळ आज दि.4/8/22 रोजीचे 10:55 वाजता करण्यात आली असून  लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिली आहे.

हि कारवाई प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद यांनी मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद व मा.विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक - पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमूगले ,विष्णू बेळे , जाकेर काझी यांनी केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणी लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं. 9527943100
श्री अशोक हुलगे,पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं.8652433397
विकास राठोड,पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं. 7719058567
कार्यालय 02472 222879

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top