आजादी का अमृत महोत्सव तसेच कम्युनिटि पोलीसींग स्किम अंतर्गत शाळेस भेट

0


आजादी का अमृत महोत्सव तसेच कम्युनिटि पोलीसींग स्किम अंतर्गत शाळेस भेट.

 

अंबी पोलीस ठाणे : ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाच्या पार्श्वभुमीवर व ‘कम्युनिटी पोलीसींग’ या योजनेअंतर्गत मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली अंबी पो.ठा. चे सपोनि- श्री. आशिष खांडेकर, पोलीस अंमलदार- लक्ष्मण माने, फिरोज शेख, सुनीता पवार यांच्या पथकाने आज दि. 04 ऑगस्ट रोजी कल्याण माध्यमिक विद्यालय, कुकडगाव व जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.







यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वृंद व ग्रामस्थ यांना ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत ‘हर घर तिरंगा’ बाबत राष्ट्रध्वज हाताळण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत विद्यार्थ्यांना लैंगीक छेडछाड प्रकरणी पोलीस काका, पोलीस दिदी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस दलातील स्वयंचलित हत्यारे, पोलीसांची कार्यशैली, समाजात असनारे पोलीसांविषयीचे समज-गैरसमज, वाहतुकीचे नियम, बाललैंगीक अत्याचारासंबंधी भारतीय दंड संहिता व पोक्सो अधिनियमातील तरतुदींसोबतच, व्यसनमुक्ती, गुड टच-बॅड टच, डायल 112, 1098 तसेच समाज माध्यमांतील गुन्ह्यांसंदर्भात मार्गदर्शन करुन त्यांचे समुपदेशन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top