सर्वरोग निदान व उपचार शिबिरास प्रतिसाद
उस्मानाबाद, दि. 10 - शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन टिके यांच्या दिवंगत आई शारदा गोविंद टिके यांच्या स्मरणार्थ मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिरास रूग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रविवारी पार पडलेल्या शिबिरात 268 नागरिकांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. तसेच गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी शासकीय आयुर्वेद रुग्णालयात पाठविण्यात आले.
शिबिरात डॉ. सचिन टिके, डॉ. मेघला कांबळे, डॉ. आरती शर्मा, डॉ. शुभम जुगनाखे, डॉ. रामवतार माली, डॉ. मोनाली ढगे, डॉ. शत्रुघ्न नेटके, डॉ. श्रीकांत राजमाने, डॉ. हर्षदा बोरगावे, डॉ. स्नेहल जंगले, डॉ. अश्विनी लाड़ेकर, डॉ. विशाखा आहेर, डॉ. रोहिणी नवथर, डॉ. रेवती सोनारे, डॉ. पवन भायेकर, डॉ. रोहन पाईकराव, डॉ. निकिता कट्टे यांनी रुग्ण तपासणी केली.