खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट

0


खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट


सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीचा मोबदला समृध्दी महामार्ग व पालखी महामार्गासाठी संपादित मावेजाप्रमाणे मिळावा यासाठी मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेबांची भेट – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर. 

            सुरत - चेन्नई ग्रीन फील्ड महामार्ग हा देशाच्या महत्वाच्या 6 राज्यातून जात असून तमिळनाडु, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून 1271 किलोमिटरचा बहुचर्चित देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रीनफील्ड महामार्ग आहे. या महामार्गामुळे मागासलेल्या राज्याला रोजगार मिळण्याची सुवर्णसंधी आहे. हा महामार्ग बहुतांश ग्रामीण भागातून जात असून धाराशिव जिल्ह्यातील परांडा, तुळजापूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून हा महामार्ग जात आहे. या महामार्गावरील संपादित जमिनीस खुपच कमी मावेजा मिळत असून संपादित झालेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाई निश्चित करताना रेडी रेकनर आणि मागील तीन वर्षात खरेदी केलेल्या दरानुसार नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली असून हा दर बाजारभावापेक्षा कमी असल्यामुळे समृध्दी महामार्ग व पालखी महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मावेजाप्रमाणे मावेजा मिळावा अशी शेतकऱ्यांकडून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे मागणी होत असून समृध्दी महामार्ग व पालखी महामार्गाप्रमाणे मावेजा मिळाला नाही तर शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.  

            त्या अनुषंगाने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेबांनी दि. 08/08/2022 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक परिवहन विकास मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेवून सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झालेल्या जमिनीसाठी समृध्दी महामार्ग व पालखी महामार्गासाठी संपादित झालेल्या जमिनीच्या मावेजाप्रमाणे मावेजा मिळावा यासाठी विनंती केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top