स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त माजी सैनिकांचा गौरव सोहळा
उस्मानाबाद:दि.19(जिमाका):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वाघोली येथील ग्रामीण वीरशैव शिक्षण संस्थातर्फे माजी सैनिकांचा, गुणवंतांचा गौरव करण्यात आला. शीवपार्वती माध्यमिक विद्यालय आणि कै. नागनाथ उंबरे प्रा. विद्यामंदिर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यालयात विविध उपक्रम घेण्यात आले. रांगोळी स्पर्धा, चित्रकला, निबंधस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या मधील प्रथम, द्वितीय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यालयात ध्वजारोहन श्री. विठ्ठल दत्तु मगर यांचे हस्ते झाले.
या कार्यक्रमासाठी वाघोली गावच्या सरपंच सौ. सुलभा संजय खडके या होत्या. ग्रा.पं. सदस्या सौ. वैशाली साखरे, सौ. कल्पना क्षिरसागर उपस्थित होत्या. ग्रामीण वीरशैव शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष संदिपान दत्तु कुंभार, सचिव रामभाऊ शेरकर, कोषाध्यक्ष आत्मलिंग सिद्राम उंबरे, सदस्य सतीष उंबरे, अशोक घेवारे तसेच माजी सैनिक शिवाजी मगर, विठ्ठल मगर, भिमराव लुंगसे, नवनाथ कुंभार, एकनाथ मगर, देविदास मगर, यशवंत सोनवणे, मोहन मगर, शहाजी गोरे, धीरज मगर, सतीष मगर, संजय खडके उपस्थित होते. या सर्व माजी सैनिकांचा शाल-श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक वीर डी. ए. , के. एम. राऊत, श्रीमती काटवटे एस.एस., ए. एम. राऊत, सुरवसे एस. डी., उंबरे सी.एम., आदी उपस्थित होते.