भूम, वाशी, परांडा येथील शिवसैनिक कायम उध्दव ठाकरे साहेबांसोबतच – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी नंतर आज दि. 16/08/2022 रोजी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भूम तालुका दौरा आयोजित केला होता याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना कोणत्याही अमिषाला व प्रलोभनाला बळी न पडता भूम तालूक्यातील सर्वसामान्य शिवसैनिक शिवसेना प्रमुख स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी वाढलेला असून तो सदैव निष्ठेने आजही पक्षप्रमुख आदरणीय उध्दव ठाकरे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. याचा मला गर्व वाटतो यापुढील काळात या अगोदरपेक्षा अधिक ताकदीने, जोमाने आणि जिद्दीने सर्वसामांन्याची कामे करत पक्षप्रमुखांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आपणा सर्वांना करायचे आहे. लढाई अवघड असली तरी अशक्य नाही असे सांगुन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात नवा आत्मविश्वास जागृत केला.
आजच्या खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या दौऱ्याला सर्वसामान्य नागरिकांमधून उदंड प्रतिसाद मिळत असून दौऱ्यावेळी वाशी तालुक्यातील पार्डी, गोलेगाव, कन्हेरी येथील शिवसैनिक, शेतकरी आणि युवकांनी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची रस्त्यावर भेट घेवून राजेनिंबाळकर यांना त्यांच्या शेतीच्या नुकसानीच्या अडचणी सांगितल्या आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक असून सदैव आदरणीय पक्षप्रमुखांच्या आणि आपल्या पाठीशी आहोत असे सांगितले.
राजकारणात माझी जी काही ओळख आहे ती फक्त शिवसेना या चार अक्षरांमुळे आहे त्यामुळे कितीही आणि काहीही संकटे आली तरी ज्या पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी आणि खासदार ओम दादांनी माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानमंडळात पोहोंचवले त्यांच्या विश्वासाशी मी कसल्याही प्रकारची तडजोड न करता सदैव त्यांच्या सोबतच राहील असे जिल्हाप्रमुख तथा कळंब – उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.कैलास घाडगे पाटील यांनी बोलताना सांगीतले. भूम शिवसेनेच्या वतीने आयोजीत त्यांच्या जाहीर सत्काराच्या वेळी ते बोलत होते.
आजच्या दौऱ्याप्रसंगी भूम तालुक्यातील बावी आणि जांब येथे शिवसैनिकाच्या वतीने निष्ठा मेळावा आयोजित केला होता याप्रसंगी बोलताना आपल्या मतदार संघातील मतदार हा सदैव निष्ठेच्या पाठीशी उभा राहणारा असून प्रलोभनामुळे पक्षाशी गद्दारी केलेल्यांना जनता कधीही माफ करणार नाही. आदरणीय पक्षप्रमुख आणि या मतदार संघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला दोन वेळेस या मतदार संघातील जनतेने मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यामुळे कठीण काळातसुध्दा पक्ष विस्तारासाठी आणि पक्षाच्या विचारांची ताकद वाढविण्यासाठी मी सदैव आदरणीय पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या सोबत असेल असे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांनी बोलताना सांगितले.
यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आमदार कैलास पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हाप्रमुख गौतम लटके, माजी नगराध्यक्ष नंदू भैय्या राजेंनिबाळकर, वाशी तालुका प्रमुख विकास मोळवणे, उपजिल्हाप्रमुख दिलीप शाळू महाराज उपस्थित होते