स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भाजपा कडून स्वतंत्र सैनिकांचा सत्कार संपन्न

0


स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भाजपा कडून स्वतंत्र सैनिकांचा सत्कार संपन्न..

 

   उस्मानाबाद : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने हिंदुस्थानला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तर कित्येकांनी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवलंकित्येकांना तुरुंगात डांबलं गेलंब्रिटिशांकडून अनन्वित अत्याचार करण्यात आलेपरंतु तरीही भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी प्राण तळहातावर घेत लढा दिला व 15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळाले. या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्या सर्व शहिदांचे स्मरण करण्यासाठी व सध्या हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल सत्कार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


यावेळी स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकरविष्णुपंत धाबेकरचनाप्पा उटगेशेषेराज बनसोडेबुबासाहेब जाधव या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार सौ. अर्चनाताई राणा जगजीतसिंह पाटील व भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नेताजी पाटील,दत्ताभाऊ कुलकर्णीॲड. अनिल काळे, , ॲड.नितीन भोसलेविजय दंडनाईकराजसिंहा राजे निंबाळकरप्रदिप शिंदेसुनील काकडेअभय इंगळेराहूल काकडे,विनोद गपाटॲड. कुलदीपसिंह भोसलेराजाभाऊ कारंडेसंग्राम बनसोडेदत्ता पेठेबापू पवारमोहन मुंडेराजेश परदेशीजगदीश जोशीश्रीराम मुंबरेप्रमोद बचाटे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संयोजक नगरपालिकेचे माजी गटनेते युवराज नळे यांनी उपस्थित सर्व स्वतंत्र सैनिकांची व त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याविषयीची माहिती विषद केली व कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top