राष्ट्राभिमान व सर्वधर्म समभावाचा संदेश देणारा दिमाखदार सोहळा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उस्मानाबाद शहरात शोभा यात्रा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट रोजी उस्मानाबाद शहरात आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. युवक युवतीसह सेवाभावी संस्था, विविध जाती धर्मातील प्रतिष्ठित नागरिक व महिलांनी यामध्ये उत्सफुर्त सहभाग नोंदविला.
शोभा यात्रेत अनेक समुदाय पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झाले होते. विविध योजनांचे फलक, राष्ट्रीय नेते आणि समाज सुधारकांचे छायाचित्र, वाद्य पथक आणि विविध देखावे या शोभा यात्रेत पाहायला मिळाले. जिजाऊ चौक येथून आमदार राणाजगजितिसंह पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ढोल ताशांच्या गजरात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून शोभा यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी देशभक्तीपर गीते व भारत मातेच्या जयघोषाणे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सुमारे दहा हजार विद्यार्थी ७५७५ फुट लांबीचा तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. उंट, घोडे व मोटार सायकलवर स्वार पारंपारिक वेशातील महिलांचा सहभाग लक्षवेधी होता.
जिजाऊ चौक, बार्शी नाका, आर. पी. कॉलेज, लेडीज क्लब, मल्टीपर्पज स्कुल, काळा मारुती चौक, नेहरू चौक, देशपांडे स्टॅन्ड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शोभा यात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात लेडीज कल्बच्या अध्यक्षा तथा माजी जि.प.उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी मुंबईहुन खास आणलेल्या महिलांच्या पथकाने दांड पट्टा, तलवार बाजी, मर्दानी खेळ या सारखे कलाविष्कार सादर केले. राष्ट्रपति महामहिम द्रोपती मुर्मु यांच्या चित्ररथासह आदिवासी बांधवांचा देखावा व त्यांचे पारंपारिक नृत्य विलोभणीय होते. संत गोरोबा काकांच्या देखाव्या बरोबर बाल वारकरी पथकाने टाळ व मृदंगाच्या गजरात संपुर्ण शहर भक्तीमय करुन टाकले. भारतीयांची अस्मीता असलेला राष्ट्रध्वज शोभा यात्रेमध्ये अभिमानाने डोलत होता.
फुलांच्या सजावटीतील भारत मातेचा रथ, महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रथासह पारंपारिक संभळ वादय समुह विशेष आकर्षणीय होते. एनसीसी व एनएसएस गणवेशातील पथक, स्काऊट गाईड पथक, तसेच शहरातील विविध शाळा, हायस्कुल व महाविद्यालयातील गणवेशासह विविध वेशभूषा परिधान केलेले ४० पथकातील अंदाजे २००० विद्यार्थी व विद्यार्थीनी यात सहभागी झाले होते. र्सावजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना.डॉ.तानाजी सावंत यांनी शोभा यात्रेमध्ये सहभागी होऊन उत्साह वाढवला.
श्री राम प्रभु यांचा रथ, सर्वधर्मीय महापुरुषांचा देखावा सादर करणारा रथ, बॅन्ड पथक, हालगी पथक, मर्दाणी खेळ पथक, सेवालाल महाराज रथ, बंजारा समाजातील महिलांची पारंपारीक वेषभुशा व नृत्य, लेझीम पथक, मराठ मोळ्या वेशभूषेतील महिलांची स्कुटर स्वारी, घोडे स्वारी, उंट स्वारी दिमाखदार होती.
यावेळी सत्यभामा शिंदे हायस्कुल, जिवनराव गोरे विद्यालय, नुतन विद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कुल, शरद पवार हायस्कुल, आसरा उर्दु हायस्कुल, तेरणा पब्लीक स्कुल, श्री रविशंकर हायस्कुल, आर पी कॉलेज, भारत विद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, अभीनव इंग्लीश स्कुल, जि.प.मुलांची शाळा, तेरणा हायस्कुल, समता माध्यमिक विद्यालय, सरस्वती हायस्कुल, जि.प.कन्या प्रशाला, ग्रिनलॅन्ड शाळा, भगीरथीबाई लाटे प्रशाला, भाई उध्दवराव पाटील शाळा, आर्य चाणक्य विद्यालय, श्रीपतराव भोसले हायस्कुल आदींनी यात सर्कीय सहभाग नोंदविला. व्यापारी महासंघ व त्यांच्या प्रतिनिधींनी शोभा यात्रेत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांसाठी पाणी व्यवस्था केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महिलांचे मर्दानी खेळ साजरे करुन राष्ट्रगीताने शोभा यात्रेची सांगता करण्यात आली. धाराशिव करांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा अभुतपूर्व भव्य दिव्य दिमाखदार सोहळा हवेत तिरंगी फुगे सोडुन उस्मानाबाद करांच्या उत्सर्फुत सहभागाने संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मेहनत घेतलेल्या व सहभागी झालेल्यांचे आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी आभार व्यक्त केले.