अवैध मद्य वाहतुक करणाऱ्यावर आनंदनगर पोलीसांची कारवाई

0




अवैध मद्य वाहतुक करणाऱ्यावर आनंदनगर पोलीसांची कारवाई

 

आनंदनगर पोलीस ठाणे : अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आनंदनगर पो.ठा. चे पथक आज दि. 16 ऑगस्ट रोजी उस्मानाबाद शहरात गस्तीस होते. दरम्यान पथकाने 12.05 वा. सु.शहरातील उस्मानाबाद- सांजा रस्त्यावर इंडीका कार क्र. एम.एच. 23 ई 7863 ही  संशयावरुन थांबवली असता कारमधून अवैध मद्य वाहतुक होत असल्याचे आढळले. 


यावर पथकाने कारची झडती घेउन आतील 180 मि.ली. क्षमतेच्या 44 बाटल्या विदेशी दारु व 90 मि.ली. क्षमतेच्या 24 बाटल्या देशी दारु अशा एकुण 9,624 ₹ किंमतीच्या अवैध मद्यासह वाहतुकीस वापरलेलेअंदाजे 1,00,000 ₹ किंमतीची नमूद इंडीका कार असा एकुण 1,9,624 ₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन कार चालक- शिवाजी  महादेव जाधव व त्यांचा सहायक- आकाश नागनाथ पाटील, दोघे रा. भंडारवाडी, ता. उस्मानाबाद यांच्याविरुध्द आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 236/2022 हा महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (अ) (ई) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


            सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन आनंदनगर पो.ठा. चे पोनि- श्री. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- गुसिंगे, पोउपनि- पाटील यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top