लोहारा येथील शिवनगर येथे शिव मित्र मंडळाच्या वतीने दही हंडी उत्सव साजरा

0
लोहारा येथील शिवनगर येथे शिव मित्र मंडळाच्या वतीने दही हंडी उत्सव साजरा

लोहारा/प्रतिनिधी
गोविंदा आला रे आला च्या जयघोषात लोहारा शहरातील शिवनगर येथे शिव मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेली दही हांडी शुक्रवारी दि.19 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 7:30 वाजता शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात फोडण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गोविंदा पथकांना दहीहंडी महोत्सव साजरा करता आला नाही. कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. गेल्या 19 वर्षापासून शहरातील शिवनगर येथे शिव मित्र मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दही हंडी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याही वर्षी दही हंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ही दहिहंडी फोडण्यासाठी शिव मित्र मंडळाच्या युवकांनी ४ मानवी मनोरे तयार केले होते. यावेळी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान केलेल्या सुरज संतोष क्षिरसागर या गोविंदाने मोठ्या जल्लोषात दही हंडी फोडली. यावेळी नगरसेवक तथा जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, शिव मित्रमंडळाचे अध्यक्ष बालाजी बिराजदार, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, राजेंद्र माळी, बालाजी माळी, शरण माळी, कमलाकर मुळे, ओमकार बिराजदार, इरशाद तळणीवाले, गौरव गोसावी, ज्ञानेश्वर माळी, अनिल यल्लोरे, महेश पाटील, महेश बिराजदार, शुभम माळी, संदीप स्वामी, सोमनाथ मुळे, महेश बिराजदार, अफजल पठाण, धिरज माळी, अभिजित माळी, प्रेम लांडगे, अंकुश परीट, संकेत माळी. योगेश बिराजदार, संदीप पाटील, दत्ता घाडगे, संदेश शेटे, विक्रम माळी, किशोर माळी, अशोक दुबे, अशोक काटे, आप्पा साखरे, यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दही हंडी पाहण्यासाठी बाल गोपाळांसह महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी उपस्थित नागरिकांना काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top