उस्मानाबाद,दि.13(जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यात आणि देशात विविध उपक्रमांचा उत्साह ओसंडून वाहत असताना त्यात उस्मानाबाद जिल्हाही मागे राहिला नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) या उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित केलेल्या प्रभात फेरी, सायक्लोथॉन आणि वृक्षारोपन यात विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक आणि पत्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रभात फेरीतील विद्यार्थ्यांच्या “भारत माता की जय”, “वंदे मातरम”च्या घोषणांनी संबंध शहर दुमदुमल्याने संबंध शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरोघरी फडकवलेल्या तिरंग्याने त्यात आणखीच भर घातली असून नागरिकांच्या घरांवर तिरंगा डौलाने फडकत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या प्रचार प्रसिध्दी आणि जाणीव जागृतीसाठी आज उस्मानाबाद शहरामध्ये जिल्हा प्रशासनातर्फे प्रभात फेरी, सायक्लोथॉनसह आणि वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.प्रभात फेरी व सायक्लोथॉनची सुरुवात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी हिरवा ध्वज दाखवून श्री.तुळजाभवानी क्रीडा संकुलातून केली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, जि.प चे अप्पर मुख्यकार्यकारी अधिकारी विलास जाधव,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी(रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश कोरडे,उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के पाटील, जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) गजानन सुसर,जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) ए.बी मोहिरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, तहसीलदार गणेश माळी, प्रमोद पांडे,आदींसह शिक्षक,मुख्याध्यापक,अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
युवकांमध्ये राष्ट्रभक्तीचा प्रसार, देशाबद्दल आत्मीयतेची भावना आणि राष्ट्रजागृती निर्माण व्हावी या हेतूने या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.प्रभात फेरीमध्ये शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांचे एनसीसी, एनएसएस, स्काऊट अॅन्ड गाईडच्या विद्यार्थ्यासह इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असे सुमारे अडीच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी , ‘माझा तिरंगा माझी शान’ आणि इतर देशभक्तीपर घोषणांनी शहर दुमदुमून काढले.
ही प्रभात फेरी क्रीडा संकुल येथून समता नगर ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे गेली. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर, जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक ,अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या हस्ते उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. पत्रकार धनंजय रणदिवे,चंद्रसेन देशमुख,संतोष जाधव,शीला उंबरे यांच्याही हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.त्यानंतर या प्रभातफेरीचे येथून विसर्जन करण्यात आले.
या प्रभात फेरीत शहरभरातील शाळा आणि महाविद्यालयांनी सहभागी झले होते. श्रीपतराव भोसले हायस्कूल या शाळेतील एनसीसी चे 50,एनएसएस चे 100 आणि इतर 350 असे एकूण 500 विद्यार्थी, श्रीपतराव भोसले हायस्कूल या शाळेतील एनसीसी चे 50,एनएसएस चे 100 आणि इतर 350 असे एकूण 500 विद्यार्थी, भारत विद्यालय या शाळेतील एनसीसी चे 25 आणि इतर 25 असे एकूण 50 विद्यार्थी, शरद पवार हायस्कूल या शाळेतील स्वातंत्र्य सेनानी वेषभुषा असलेले 05 आणि इतर 75 असे एकूण 80 विद्यार्थी, तेरणा हायस्कूल चे 50 विद्यार्थी,छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेतील एनसीसी चे 40,वेषभुषा 20 आणि इतर 400 असे एकूण 460 विद्यार्थी, सरस्वती विद्यालय या शाळेतील,वेषभुषा 15 आणि इतर 100 असे एकूण 115 विद्यार्थी, आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालय या शाळेतील,पारंपरिक दिंडीचे 25 आणि इतर 100 असे एकूण 125 विद्यार्थी, समता माध्यमिक विद्यालय या शाळेतील 50 विद्यार्थी, भगीरथीबाई लाटे विद्यालय या शाळेतील,50 विद्यार्थी, श्री.श्री रविशंकर विद्या मंदिर या शाळेतील,वेषभुषा 5,भारतमाता एक विद्यार्थिनी आणि इतर 150 असे एकूण 156 विद्यार्थी, पोदार इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील 100 विद्यार्थी, अभिनव इंगलिश स्कूल या शाळेतील 100 विद्यार्थी, रामकृष्ण परमहंस या महाविद्यालयातील एनसीसी चे 30,एनएसएस चे 50 आणि इतर 150 असे एकूण 230 विद्यार्थी, धाराशिव प्रशाला श्रीपतराव भोसले हायस्कूल या 100 विद्यार्थी, जिल्हा परिषद कन्या प्रशाला या शाळेतील एनसीसी चे 25 आणि इतर 100 असे एकूण 125 विद्यार्थी आणि जिल्हा परिषद मुलांची प्रशाला या शाळेतील 50 विद्यार्थी, असे सुमारे अडीच हजार विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.
यावेळी आयोजित सायक्लोथॉनमध्ये शहरातील उस्मानाबाद मॅरोथॉन ग्रुप, पोलीस, महसूल, जिल्हा परिषद आणि अन्य शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले.विशेष म्हणजे जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, निवासी उपजिल्हा अधिकारी समवेत इतर अधिका-यांनीही या सायक्लोथॉनमध्ये आवर्जुन सहभाग घेतला. सायक्लोथॉन कार्यक्रमाचा मार्ग क्रीडा संकुल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- संत गाडगे महाराज चौक, जिल्हाधिकारी निवासस्थान चौक - काळा मारुती चौक-ताजमहल टॉकीज चौक- शासकीय आर्युवेदिक महाविद्यालय चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक क्रीडा संकुल असा होता.