मोहा येथे अवैध गुटखा बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
कळंब पोलीस ठाणे : कळंब पोलीस ठाण्याचे पथक पो.ठा. हद्दीतील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी काल दि. 25 ऑगस्ट रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथक कळंब तालुक्यातील मोहा येथे आले असता पथकास गोपनीय माहिती मिळाली की, मोहा ग्रामस्थ- उमेश बाबुराव मडके यांनी आपल्या दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा साठवला आहे. यावर पथकाने उमेश मडके यांच्या दुकानात 12.45 वा. सु. छापा टाकला असता पोत्यांत महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखू असा एकुण 27,530 ₹ किंमतीचा माल बाळगलेले आढळले. यावर पथकाने नमूद माल जप्त करुन उमेश मडके यांच्याविरुध्द कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 325/2022 हा भा.दं.सं. कलम- 328, 272, 272 अंतर्गत दि. 25 ऑगस्ट रोजी 18.23 वा. सु. गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगीरी कळंब पो.ठा. चे पोनि- श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ- कोळेकर, पोना- दळवे, सोनटक्के, पोकॉ- मुळे, जाधव यांच्या पथकाने केली आहे.