उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी चार ठिकाणी कारवाई
अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 25 ऑगस्ट रोजी 6 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यातील देशी दारुच्या 12 बाटल्या, 48 लि. गावठी दारु व 52 लि. शिंदी हा अंमली द्रव जप्त केला. जप्त केलेल्या एकुण मद्याची अंदाजे किंमत, 9,370 ₹ असून छाप्यादरम्यान संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.
1) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता यात नांदगाव ग्रामस्थ- छायाप्पा माने हे 20.30 वा. सु. नांदगाव शिवारात एका कॅनमध्ये 8 लि. गावठी दारु बाळगलेले तर खानापुर ग्रामस्थ- महोदव कांबळे हे 21.15 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर एका कॅनमध्ये 30 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
2) उमरगा पो.ठा. च्या पथकाने उमरगा शहरात दोन ठिकाणी छापे टाकले असता यात बालाजीनगर येथील- लक्ष्मण भाटे हे 15.40 वा. सु. महात्मा फुले नगर येथील एका पत्रा शेडसमोर 10 लि. शिंदी हे अंमली द्रव बाळगलेले तर उमरगा येथील राहुल सुर्यवंशी हे 16.50 वा. सु. एस.टी. कॉलनी येथे एका घागरीत 42 लि. शिंदी हे अंमली द्रव बाळगलेले असताना आढळले.
3) मुरुम पो.ठा. च्या पथकाने उमरगा तालुक्यातील चिंचोली (भु.) येथे छापा टाकला असता ग्रामस्थ- बापुराव गायकवाड हे 19.40 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर एका कॅनमध्ये 10 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
4) येरमाळा पो.ठा. च्या पथकाने कळंब तालुक्यातील पानगाव येथे छापा टाकला असता ग्रामस्थ- भास्कर पवार हे 11.45 वा. सु. पानगाव बस स्थानकाजवळ 12 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.