रात्रगस्तीदरम्यान पोलीसांना तीन पुरुष संशयीतरित्या आढळले
उस्मानाबाद जिल्हा : येरमाळा पोलीस ठाण्याचे पथक दि. 24 ऑगस्ट रोजी 22.45 वा. सु. हद्दीतील चोराखळी शिवारात रात्रगस्तीस असताना उड्डानपुलाजवळ एका हॉटेलच्या आडोशाला वाघोली, ता. कळंब येथील- शिवाजी पवार हा अंधारात दबा धरुन बसलेला पथकास आढळला. तसेच कळंब पो.ठा. चे पथक दि. 25 ऑगस्ट रोजी 04.40 वा. सु. कळंब शहरात गस्तीस असताना एका पानटपरीच्या बाजूला कळंब येथील- कृष्णा काळे हा अंधारात दबा धरुन बसलेला पथकास आढळला.
पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन जाण्याचा प्रयत्न करत असतांना पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. तर आनंदनगर पो.ठा. चे पथक दि. 25 ऑगस्ट रोजी 03.45 वा. सु. उस्मानाबाद शहरात गस्तीस असताना राष्ट्रीय महामार्गावरील एमआयडीसी उड्डानपुलाजवळ असलेल्या एका किराणा दुकानाच्या आडोशाला महाड, जि. रायगड येथील सुर्यकांत माने हा अंधारात दबा धरुन बसलेला पथकास आढळला.
यावर पोलीसांनी त्या तीघांना अशा अवेळी त्या ठिकाणी उपस्थित असण्याबाबत विचारणा केली असता ते पोलीसांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याने ते तीघे माला विषयीचे गुन्हे करण्याच्या उद्देशाने तेथे दबा धरुन बसले असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्या तीघांना ताब्यात घेउन त्यांच्याविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 122 (क) अंतर्गत स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.