लोहारा नगरपंचायत कार्यालयावर पाण्यासाठी नागरीकांचा घागर मोर्चा

0
लोहारा नगरपंचायत कार्यालयावर पाण्यासाठी नागरीकांचा घागर मोर्चा

लोहारा/प्रतिनिधी

लोहारा शहरातील प्रभाग क्र.1,2,3,4 या भागात सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी नागरिकांनी लोहारा नगरपंचायतीवर दि.29 ऑगस्ट 2022 रोजी घागर मोर्चा काढत. नगरपंचायत कार्यालयासमोर दोन तास ठिय्या मांडला. लेखी अश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. लोहारा शहारातील प्रभाग क्र.1, 2, 3, 4 या भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यातच या भागाला जो पाणीपुरवठा केला जातो तो क्षारयुक्त आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यापूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या जलकुंभातून 50 ते 55 वर्षापासून पाणीपुरवठा केला जात होता. परंत जलकुंभ जीर्ण झाल्याने दोन वर्षापूर्वी पाडण्यात आली. शिवाय पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी कमकुवत झाल्याने ठिकाणी ती फुटली आहे. त्यामुळे मागील काही वर्षापासून या भागात पाण्याची समस्या आहे. पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायतीने विंधन विहिरीची सोय केली आहे. परंतु विंधन विहिरीतून येणारे पाणी क्षारयुक्त आहे. या भागात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी गेली अनेक वर्षापासून नगरपंचायतीकडे पाठपुरावा केला. यासाठी कॉग्रेसचे नगरसेवक प्रशांत काळे यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते. तरीही नगरपंचायतीने दखल घेतली नसल्याने सोमवारी घागर मोर्चा काढला. त्यानंतर तब्बल दोन तास नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला. या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. यानंतर नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, पाणीपुरवठा सभापती मयुरी बिराजदार, कार्यालयीन अधीक्षक जगदिश सोंडगे यांच्यासह आदींनी आंदोनकर्त्याशी चर्चा करून 31ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या मोर्चात कॉग्रेसचे नगरसेवक प्रशांत काळे, विजयकुमार ढगे, दिपक मुळे, के.डी.पाटील,युवक कॉग्रेसचे शहरध्यक्ष हरी लोखंडे, दत्ता स्वामी, भागवत जवादे, बाळू पाटील, विजय महानुर, श्याम नारायणकर, वीरभद्र फावडे, रामेश्वर वैरागकर, सुनील ठेले, तुकाराम विरोधे, प्रेम लांडगे, मल्लिकार्जुन बनशेट्टी, सुनील देशमाने, राहुल रेणके, पंडित लोहार, अल्लीशेर बागवान, सय्यद इनामदार, चेतन पवार, तुलसी काळे, लिंबाबाई कुंभार, कांचन खताळ, सुवर्णा महानुर, समिर फकिर, नामदेव रेणके, चेतक पवार, सोपान गाडेकर, माणिक माळी, विठ्ठल विरुदे, यांच्यासह अनेक महिला नागरिक सहभागी झाले होते. यावेळी प्रभारी पो‌.नि. सुनिलकुमार काकडे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहुन चोख पोलीस बंदोबस्त लावला होता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top