( बातमी संकलन - दत्ता चौधरी )
मुरूम महसूल मंडळातील १७ गावाना अतिवृष्टीतुन वगळल्यामुळे बसव प्रतिष्ठाण च्या माध्यमातून समाजसेवक डॉ.रामलिंग पुराणे यांच्या नेतृत्वाखाली दि.२५ सप्टेंबर रोजी मुरूम मोड येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.
मुरूम महसूल मंडळास जाणून बुजून वारंवार शासकीय योजनेतून वगळण्यात येते.
मुरूम महसूल मंडळास अतिवृष्टीत समाविष्ट करून नुकसान भरपाई देणे व योग्य ठिकाणी पर्जन्य मापक यंत्र बसवणे हे मागणी घेऊन रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.