ढोकी येथील कबालेधारकांना मिळाला न्याय; लाभार्थ्यांना ४७ वर्षांनी कबाला नोंदीचे प्रमाणपत्र वाटप

0
ढोकी येथील कबालेधारकांना मिळाला न्याय; लाभार्थ्यांना ४७ वर्षांनी कबाला नोंदीचे प्रमाणपत्र वाटप

उस्मानाबाद - 
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील राजेशनगर, दत्तनगरयेथील शासकीय भूखंडावरील कबालेधारकांना कबाला प्रमाणपत्राचे वाटप  करण्यात आले. माजी मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रयत्न आणि ढोकी येथील भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष निहाल काझी व इतर पदाधिकार्‍यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर तहसीलदार गणेश माळी प्रशासकीय यंत्रणा गतिमान करून कबालेधारकांना न्याय मिळवून दिला आहे. याबद्दल कबाला धारकांच्या वतीने निहाल काझी यांचा सत्कार करण्यात आला.

ढोकी येथील दत्तनगर या ठिकाणी शासकीय भूखंडावर वस्तीवाढ करण्यात आली होती. त्या वाटपानुसार लाभार्थ्यांना नियमानुसार सर्व कायदेशीर कार्यवाही करुन भूखंडाचे वाटप करण्यात आले होते. परंतु अनेक वर्ष झाल्यानंतरही सव लाभार्थ्यांची नोंद ग्रामपंचायतच्या 8-अ ला मालकी हक्कात घेण्यात आलेली नव्हती.  या काळामध्ये अनेक लाभार्थ्यांकडून हक्क अभिलेख गहाळ झालेले होते, तर काहीजणांना ते मिळालेच नव्हते. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात नोंद नसल्यामुळे लाभार्थ्याचे नाव मालकी हक्कामध्ये न घेता भोगवटादार वर्गात नोंदवण्यात आले होते. अनेक वर्षापासून त्या जागेवर राहात असूनही शासकीय व इतर योजनेचे लाभ मात्र मिळत नव्हे. त्यामुळे या लोकांना हक्क अभिलेख उपलब्ध करुन द्यावेत किंवा या लोकांचा ग्रामपंचायत 8-अ च्या मालकी हक्कात नाव येण्याच्या दृष्टीने कार्यवाही व्हावी याकरिता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. 

आ.राणादादांनी तात्काळ दखल घेत उस्मानाबादचे तहसिलदार श्री. गणेश माळी यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. तहसिलदार श्री. माळी यांनी तात्काळ कार्यवाही करुन 47 वर्षापूर्वीचे दत्तनगरमधील सर्वे नंबर 99 मधील कबाले उपलब्ध करुन दिले. या सर्व प्रक्र्रियेचा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष निहालभाई काझी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनंतराव देशमुख, भाजपा नेते सतीश देशमुख, तालुका उपाध्यक्ष प्रमोद देशमुख, बारीसाहेब काझी, झुंबरआबा बोडके, विलास रसाळ, इरफान काजी ,हरिभाऊ तिवारी, अंकुश जाधव,श्रीकांत ढवारे,प्रभाकर गाढवे, भारत जमदाडे,एजाज काझी, किशोर तिवारी, नासिर शेख, तानाजी माळी या मंगेश तिवारी सर्वांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आमदार राणागजितसिंह पाटील, तहसिलदार गणेश माळी यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी निहालभाई काझी म्हणाले की, राजेशनगर भागातील हक्क अभिलेख (कबाले) देखील तहसीलदार श्री गणेश माळी यांनी येणार्‍या काही दिवसांत मिळतील असे आश्वस्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top