पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तांदुळवाडी ता.परंडा येथे तेरणा ट्रस्टच्या आरोग्य शिबीरात ५३५ पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचार
डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व ॲड.गणेश बाबासाहेब खरसडे (जिल्हा सरचिटणीस भाजपा) आयोजित सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तेरणा ट्रस्टच्या आरोग्य शिबिराचे आयोजन बुधवार दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी, तांदुळवाडी ता.परंडा येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात गावातील व परिसरातील सर्व वयोगटातील ५३५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन सौ. मनिषा गोरे (सरपंच, तांदुळवाडी ता.परंडा) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती मा.राजकुमार पाटील (भाजपा तालुका अध्यक्ष,परंडा), डॉ.अमोल गोफणे, राहुल जगताप, साहेबराव पाडुळे, किरण यादव (ग्रामसेवक), जगदीश पाटील (पोलीस पाटील), बाजीराव दुरुंडे (माजी सरपंच, तांदुळवाडी), श्रीराम खरसडे (माजी सरपंच), संभाजी खरसडे, पंडीत खरसडे, काका कांबळे, राम खरसडे, शंकर मुळीक, राहुल पवार, नवनाथ खरसडे, तात्या बदल, रसुल सय्यद, बाबासाहेब सावंत, सुग्रीव खरसडे, वसंतराव दुरुंडे, भीमराव दुरुंडे, मंगेश बोराडे, पिंटु भारती, बाळासाहेब हवालदार, पोपट खरसडे, अनिल भगवान खरसडे, तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलत असताना ॲड. गणेश खरसडे यांनी मा.आ.राणाजगजिसिंह पाटील यांनी जनसेवा हीच ईश्वरसेवा या उक्तीप्रमाणे समाजसेवेचे कार्य अविरत होती घेतली आहे. परंडा तालुक्यातील तांदुळवाडी गावामध्ये आज प्रथमच हे आरोग्य शिबीर होत आहे. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. शिबीराचा तळागाळातील लोकांनी फायदा घ्यावा व राणादादांनी हाती घेतलेल्या समाजसेवेच्या कार्यास सहकार्य करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.सागर पाटील, डॉ. हर्षद, डॉ. शिवचंद्र पवार, डॉ. दानिष मेमन, डॉ.दिपक बाराते यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरीक, बालके आदिनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच जनसंपर्क अधिकारी विनोद ओव्हाळ, पवन वाघमारे, निशिकांत लोकरे, रवी शिंदे, अंगणवाडी कार्यकर्ती सुवर्णा कोरे, सुवर्णा हवालदार, आशा वर्कर शांताबाई कोरे, वैशाली कोकाटे, पद्मीनी होरे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. तुळशीराम उकिरडे यांनी केले.