परंडा पोलीस ठाणे : पाचपिंपळा, ता. परंडा येथील- रणजित महाविर मंगरुळे यांच्या ट्रॅक्टरचा ट्रेलर त्यांच्या घरासमोरील अंगनातून तर गावकरी- विलास विठ्ठल खैरे यांचा पाच फाळाचा नांगर अज्ञात व्यक्तीने दि. 03.09.2022 रोजीच्या रात्री चोरुन नेला होता. अशा मजकुराच्या रणजित मंगरुळे यांनी दि. 05.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
तपासादरम्यान परंडा पोलीस ठाण्याच्या पोनि- श्री. सुनिल गिड्डे यांच्या पथकाने माहिती घेतली असता पाचपिंपळा ग्रामस्थ- गणेश सांगळे याचा चोरीत सहभाग असावा अशी पोलीसांची खात्री झाली. यावर आज दि. 07 सप्टेंबर रोजी पोलीसांनी सांगळे यांस अटक करुन नमूद चोरीतील ट्रेलर व नांगरासह ती चोरी करण्यासाठी वापरलेला स्वराज ट्रॅक्टर त्यांच्या ताब्यातून जप्त केला आहे.