मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्या बैठक - आ. राणाजगजीतसिंह पाटील
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यात देखील शोभा यात्रेसह विविध कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले मात्र हैदराबाद, काश्मीर व जुनागड ही संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. मराठवाडा हा त्यावेळी हैदराबाद संस्थानाचा भाग होता. मराठवाड्याच्या जनतेला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हैदराबादच्या निजामा विरोधात दीर्घ लढा द्यावा लागला. या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली होती. या लढ्यात अनेकांना हुतात्म्य देखील आले.
१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला व खऱ्या अर्थाने मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. दरवर्षी हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. या लढ्याला आता ७५ वर्षे पूर्ण होत असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा, याविषयी विचार विमर्श करण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे उद्या दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता बैठक बोलावण्यात आली आहे.
तरी जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सदरील बैठकीस उपस्थित राहून आपल्या संकल्पना मांडव्यात असे आवाहन आ. राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांनी केले आहे.