लोहारा शहरातील वीरशैव ककय्या गणेश मित्र मंडळा च्या गणपती ची आरती आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील वीरशैव ककय्या नगर येथे दि.5 सप्टेंबर 2022 रोजी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते वीरशैव ककय्या गणेश मित्र मंडळा च्या गणपती ची आरती करण्यात आली. लोहारा येथील वीरशैव ककय्या गणेश मित्र मंडळाची स्थापना 1985 साली झाली. वीरशैव ककय्या गणेश मित्र मंडळाच्या वतीने मिरवणुकी दरम्यान विविध आकर्षक महाभारत,रामायण,पौराणिक कथा यातील पात्राचे देखावे सादर करण्याची परंपरा आहे. यानंतर वीरशैव ककय्या नगर येथील नियोजित साईबाबा मंदिर जागेच्या परिसरात आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी 80 हुन अधिक वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवसेना (शिंदेगट) जिल्हा प्रमुख मोहन पनुरे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख,लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील,उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे,अभिमान खराडे, नगरसेवक जालिंदर कोकणे,अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन नगरसेवक तथा जिल्हा बोर्ड संचालक अविनाश माळी, नगरसेवक हाजी अमीन सुंबेकर,पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे,बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले,ओम कोरे,युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे,रमेश कोकणे, गोरख नारायणकर,शिवहर नारायणकर,यांच्यासह मंडळ अध्यक्ष विशाल कोकणे, उपाध्यक्ष प्रतिक गिरी,सचिव रोहित नारायणकर,सदस्य अंकुश नारायणकर,बाबुराव नारायणकर, लक्ष्मण कोकणे, राहुल कोकणे,लहू नारायणकर,स्वप्निल नारायणकर,संतोष शेवाळे, देवानंद शेवाळे, विनायक कोकणे दत्ता कोकणे, शुभम कोकणे,आदी उपस्थित होते.