सर्वसामान्य शिवसैनिक आजही आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर

0



सर्वसामान्य शिवसैनिक आजही आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत  - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर

 

      Osmanabad :  शिवसेना हा फक्त एक पक्ष नसून शिवसेना ही सर्वसामान्य मानसांच्या मनात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तयार झालेला आणि जनसामान्यांनी मान्य केलेला एक विचार आहेअसे मत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि. १५ सप्टेंबर रोजी भुम – परांडा आणि वाशी तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गतच्या मंजूर रस्त्याच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी मांडले. दि.१५ सप्टेंबर रोजी भुम – परांडा आणि वाशी तालुक्यात ३०.१९ कोटी रु. च्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत च्या रस्त्यांचा उद्घाटन समारंभ धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. ओम राजेनिंबाळकरमाजी आमदार श्री. ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलायाप्रसंगी खासदार श्री.राजेनिंबाळकर बोलत होते.

            पुढे बोलताना श्री. राजेनिंबाळकर म्हणाले कीवंदनिय प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य मराठी मानसाला न्याय, हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने ही सर्वसामान्यांच्या विकासाची विचारधारा असणारी संघटना निर्माण केलीत्यामुळे कोणाच्या येण्याने किंवा कोणाच्या जाण्याने विचार धारेवार आणि विचारांवर कोणताही परिणाम पडत नसतो किंवा विचार संपत नसतो. शिवसेनेचा उगम हा झगडण्यासाठीलढण्यासाठी आणि संघर्षासाठी झालेला असून संघर्ष आणि भुकंप काही शिवसेनेला नविन नाहीअसेही पुढे खा. श्री. राजेनिंबाळकर यांनी सांगीतले. पुढे बोलतानाउस्मानाबाद जिल्हा हा सुरवातीपासुनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला असून येथील मतदार राजा निष्ठाप्रमाणिकपणा आणि वचन या त्रिबंधनाने बांधलेला असून तो आजतागायत कसल्याही प्रलोभनांना बळी पडला नाही आणि पडणार नाही हा ठाम विश्वास आमच्यासह मातोश्री ला आहेअसेही खा. राजेनिंबाळकर यांनी सांगितले. पुढे बोलतानाजे जिल्ह्याला गेल्या ४० वर्षात मिळाले नाही ते राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला गेल्या आडीच वर्षात मिळाले. आज उद्घाटन झालेल्या सर्व रस्त्यांच्या कामांचा दर्जा उच्च प्रतिचा ठेवून रस्त्यांची कामे करावी असेही गोलेगावसरमकुंडीदुधोडीमानिकनगर या ‍ठिकाणी उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री. राजेनिंबाळकर यांनी सांगीतले.


            १९९२ – ०९३ च्या दरम्यान तत्कालीन सरकारमध्ये सामाविष्ठ असणाऱ्या सर्व मंत्र्यांनी आपाल्या मतदारसंघातील जनतेच्या काळजीपोटी आणि सहानुभुतीप्रती आपापल्या जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिल्या ज्यामुळे त्यांच्या आपल्या मतदारसंघातील आरोग्याच्या समस्या सुटल्या पाहीजेत परंतु आपल्या जिल्ह्यातील तत्कालीन मंत्रीमंडळात सामाविष्ठ असणाऱ्यांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी जिल्ह्याच्या हक्काचे असणारे आणि जिल्ह्यासाठी गरजेचे असणारे शासकिय वैद्यकीय महाविद्यालय नेरुळ ला नेले या स्वार्थी प्रवृत्तीच्या विरोधात आपण लढा देत आहोत. राज्याचे विधानमंडळ हे राज्यातील सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न आणि कामे मार्गी लावण्याचे सभागृह आहे आणि त्यासाठी जनता जनार्धन आपणाला निवडून देत असते मात्र तुळजापुरच्या आमदाराने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झालेल्या डीपी च्या विरुद्ध तारांकीत प्रश्न करून सदर कामाची चौकशी लावून आज शेतकऱ्यांना अडचणीमध्ये लोटण्याचा पराक्रम केला आहे या प्रवृत्तीला जनता कधीही माफ करणार नाहीअसेही श्री. राजेनिंबाळकर यांनी सांगीतले. ज्या आदरणीय शरद पवार साहेबांनी ह्यांच्या वडीलांना डोळे झाकुन ४० वर्षे मंत्रीपद दिले पोराला कसलाही अनुभव नसताना विधानपरिषदेवर आमदार करुन राज्याचा राज्यमंत्री केले त्या पवार साहेबांचा पक्ष विरोधी सत्तेत असताना हे खुर्चीच्या लालसेपोटी आणि जिल्ह्याच्या विकासाचे कारण सांगून पवार साहेबांना सोडून गेले जर फक्त सत्तेत असतानाच आणि मंत्रीपद असतानाच जर हे विकास करु शकत होते तर गेले ४० वर्षे ह्यांनी फक्त स्वत:च्या घराचाच विकास केला का की ज्यामुळे आज हे Land Cruiser मध्ये फिरतात असाही घणघणाती सवाल याप्रसंगी खासदार श्री. ओम राजेनिंबाळकर विचारला.

            या प्रसंगी जिल्हाप्रमुख श्री.गौतम लटके सरभुम तालुकाप्रमुख श्री. ज्ञानेश्वर जाधवरवाशी तालुकाप्रमुख श्री. विकास मोळवणेपरांडा तालुकाप्रमुख श्री. मेघराज पाटीलमाजी सभापती शंकर दादा इतापेशिवाजी मेहरनगरसेवक अजय वीरबाळासाहेब उंदरे यांच्यासह नागरीकपदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top