सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा

0
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा

             
उस्मानाबाद,दि.05(जिमाका):- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत हे आज दि.06 सप्टेंबर 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

              मंगळवार,दि.06 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 08.00 वाजता B.I.T. कॉलेज बार्शी येथून परांड्याकडे प्रयाण. सकाळी 09.00 वाजता परांडा येथे आगमन व दर्गाह येथे दर्शन. सकाळी 9.15 वाजता उपजिल्हा रुग्णालयास भेट. सकाळी 09.45 वाजता तहसील कार्यालयात सर्व तालुकास्तरीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समवेत तालुका आढावा बैठक. सकाळी 10.45 वाजता सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.येथे आगमन व राखीव. 
              सकाळी 11.45 वाजता भूमकडे प्रयाण. दुपारी 12.30 भूम येथे आगमन व आलमप्रभु देवस्थान दर्शन. दुपारी 01.00 वाजता तहसील कार्यालयात सर्व तालुकास्तरीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समवेत तालुका आढावा बैठक. दुपारी 02.00 वाजता वाशी तालुक्याकडे प्रयाण. 
              दुपारी 02.45 वाजता वाशी येथे आगमन आणि तहसील कार्यालयात सर्व तालुकास्तरीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समवेत तालुका आढावा बैठक. दुपारी 03.45 वाजता वाशी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. येथे आगमन व राखीव. सायंकाळी 04.45 वाजता कळंबकडे प्रयाण. सायंकाळी 05.30 वाजता कळंब येथे आगमन आणि श्री.अजित पिंगळे यांच्या निवासस्थानी राखीव. सायंकाळी 06.00 वाजता उस्मानाबाद (धाराशिव) कडे प्रयाण. 

               सायंकाळी 06.45 वाजता उस्मानाबाद (धाराशिव) येथे आगमन आणि दर्गाह दर्शन. सायंकाळी 07.00 वाजता श्री.सुरज साळुंखे यांच्याकडे गणेश मंडळास भेट. रात्री 07.30 वाजता सिव्हिल हॉस्पिटलला भेट. रात्री 08.30 वाजता तुळजापूरकडे प्रयाण. रात्री 09.00 वाजता कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर दर्शन आणि सोईनुसार पुणेकडे प्रयाण.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top