भूकंपग्रस्तांसाठी संपादित जागा ग्रामस्थांच्या नावे करण्याच्या मागणीसाठी फकिरा ब्रिगेडचे आमरण उपोषण

0

भूकंपग्रस्तांसाठी संपादित जागा ग्रामस्थांच्या नावे करण्याच्या मागणीसाठी फकिरा ब्रिगेडचे आमरण उपोषण


उस्मानाबाद -  
उमरगा तालुक्यातील काळा निंबाळा येथे भूकंपग्रस्तांसाठी शासनाने संपादित केलेल्या जागोवर सध्या राहात असलेल्या ग्रामस्थांच्या नावे आठ-अ उतारा देण्यात यावा तसेच भूकंपग्रस्तांची घरे इतर कब्जाधारकांना कोणत्या अधिकार्‍यांच्या परवानगीने दिली याची माहिती देण्याच्या मागणीसाठी फकिरा ब्रिगेडच्या वतीने आज (दि.13) जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

फकिरा ब्रिगेडच्या वतीने आंदोलनाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे कही. काळा निंबाळा येथील येथील ग्रामपंचायत कार्यालयाने भूकंपग्रस्तांची घरे इतर कब्जाधारकांना  कोणत्या अधिकार्‍यांच्या परवानगीने देण्यात आली आहेत याची माहिती देण्यात यावी. तसेच गावातील व जिल्ह्यातील वंचित कब्जाधारकांना नियमित करुन घेऊन त्यांच्या नावे आठ-अ देण्यात यावे. त्याचबरोबर जेवळी येथील भूखंड क्रमांक 83 बी आणि 98 बी हे कोणाच्या नावे आहेत याची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असून सदरील जागेच्या मूळ कबालाची नक्कल देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

फकिरा ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष श्रीरंग सरवदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नागीनी थोरात यांच्या नेतृत्वाखाली या उपोषणात कल्याणी सरवदे, हनुमंत सरवदे, सखुबाई क्षीरसागर, राम दंडगुले, बालाजी दंडगुले, काजल गवळी, राधिका गवळी, शरणाप्पा बनसोडे, बालाजी कुंभार, धोंडाबाई गायकवाड, साखरबाई रोडगे, नागेश सरवदे, सुग्रीव बनसोडे, शांताबाई दंडगुले, कांचन ईटकर, दत्ता ईटकर, कविता सरवदे, सुनंदा दंडगुले, अंबुबाई ईटकर, हणमंत सरवदे, अंबाजी सरवदे, माया शिंदे, पांडुरंग सरवदे, अर्चना सरवदे, मंगलबाई सरवदे व इतर ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top