आरोग्य मंत्री सावंत यांनी केली अतिवृष्टी भागाची पाहणी , शेतकऱ्यांच्या लेकरांचे हे सरकार, शेतकरयासाठीच काम करणार- पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत

0
आरोग्य मंत्री सावंत यांनी केली अतिवृष्टी भागाची पाहणी , शेतकऱ्यांच्या लेकरांचे हे सरकार, शेतकरयासाठीच काम करणार- पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत

उस्मानाबाद(प्रतिनिधी) हे सरकार शेतकऱ्यांच्या लेकरांचे आहे , त्यामुळे शेतकरयासाठीच काम करत आहे,पुतणा मावशीचे प्रेम दाखवणारया पासून आपण सर्वांनी सावध रहावे असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले, उस्मानाबाद जिल्ह्य़ातील अतिवृष्टी भागाची पाहणी करताना ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. यापूर्वीच शेतकऱ्याच्या खात्यावर खरिपाच्या पेरणी नंतर साठ कोटी जमा झाले आहेत आता परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा लवकरच मदतीचा जवळपास दिडशे कोटी रूपयाचा प्रस्ताव शासनास पाठविला जाणार असल्याचे सावंत यांनी शेतकर्यांना धीर देतांना सांगितले. 
उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परांडा,वाशी,इंदापूर आणी कळंब या तालुक्यात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पालकमंत्री सावंत यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या समावेत उपविभागीय आधिकारी अहिल्या गाठाळ, तहसिलदार रेणुकादास देवणीकर, तहसीलदार नरसिंग जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताअण्णा शिंदे, नाना गाढवे, शिवसेना नेते प्रशांत चेडे,यांच्यासह विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

आत्महत्याग्रस्त शेतकरी दाम्पत्यांच्या लेकरांना घेतले दत्तक
   परांडा येथे शुक्रवारी सकाळी अतिवृष्टी भागाची पाहणी करून त्या भागातील शेतकर्यांना धीर देऊन वाशी येथे पालकमंत्री सावंत पोहचले , पोहचताच वाशी तालुक्यातील दशमे गावातील बाबुराव रघुनाथ उघडे,सौ.सारिका बाबुराव उघडे या शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, या कुटुंबीयांचे सांत्वन करून मुलगा रूपशे आणी मुलगी दिव्या यांच्याकडे संवेदना व्यक्त केल्या. यावेळी या दोन्ही मुलांना आपण दत्तक घेत असल्याचे मुलांचे मामा विवेक चव्हाण यांना सांगून त्यांच्या शिक्षणा पासून विवाह पर्यंतची जवाबदारी आपण घेत आहोत असे सांगितले. एवढेच नाहीतर या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत तात्काळ केली. दिव्या उघडे या मयत शेतकरी दाम्पत्यांच्या मुलीशी बोलताना ते म्हणाले की घडणारी घटना ही अत्यंत दुर्दैवी होती परंतु यातून तु सावरून आईवडिलांचे स्वप्न पूर्ण कर ,हीच त्यांना खर्या अर्थाने श्रध्दांजली ठरेल. तुझ्या स्वप्नपूर्ती करिता हा मामा तुझ्या पाठीशी आहे. तु तुझ्या करियर वर लक्ष केंद्रित कर असा वडिलकीचा सल्ला दिला.

यावेळी घाटनांदूर येथील शेतकरी सय्यद जावेद करिम यांच्या आईच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला त्यांचेही सांत्वन करून त्यांना देखील  दोन लाख रूपयांची मदत दिली. 


गावांतर्गत रस्त्यासाठी 35 कोटी रूपये मंजूर

गोजवाडा येथील नदीवरील पुलांची पाहणी करून या गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ग्रामस्थांशी गावाच्या विकासावर चर्चा करताना सावंत यांनी गावांतर्गत येणारया रस्त्या करिता पस्तीस कोटी रूपयांचा निधी जिल्ह्यासाठी मंजूर केल्या असल्याचे ग्रामस्थांना आवर्जून सांगितले.  यावेळी गावातील वयोवृद्ध यांची आपुलकीने विचारपूस त्यांनी केली. 

पुतणा मावशीचे प्रेम ओळखा

  इंदापूर गावातील राजेंद्र गीरी या शेतकरयांच्या बांधावर जाऊन त्याच्यासह गावातील शेतकऱ्यांसह सावंत यांनी पाहणी करताना परतीच्या पावसाने अतोनात नुकसान केले असल्याचे सांगून हे सरकार आपले सर्वांचे म्हणजेच शेतकरयांच्या पोरांचे आहे, त्यामुळे आपण काळजी करू नये असा दिलासा देत यापूर्वी खरिपा नंतर साठ कोटी रूपयांची मदत आपण वाटली आता ही नियम अटीचा विचार न करता शेतकऱ्याचा विचार करून जवळपास दिडशे कोटी रूपया पेक्षा जास्त मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात येईल असे सावंत यांनी यावेळी सांगितले. एकही शेतकरी मदती पासून वंचित राहणार नाही याची आपण स्वतः खात्री करणार आहोत. त्यामुळे शेतकरयानी पुतणा मावशीचे प्रेम व्यक्त करणार्या पासून सावध राहावे असे आवर्जून सांगताना मागील अडीच वर्षांत किती शेतकर्याला मदत दिली , कोण किती वेळा तुमचा बांधावर येऊन तुमची विचारपूस केली हे सर्वांना माहित आहे असा टोला विरोधकांना यावेळी त्यांनी लगावला. शेतकरी हा जाणकर आहे त्यामुळेच शिंदे-फडणवीस सरकार हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणानी उभे आहे असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top