google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या ठोस आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या ठोस आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

0

मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्री यांच्या ठोस आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Osmanabad : 
खरीप हंगाम 2020  व खरीप हंगाम 2021 चे उर्वरित पीकविम्याची नुकसान भरपाई व 2022 चे अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झालेले अनुदान तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांचे मागील 6 दिवसापासून उपोषण चालू होते. आज उपोषणाच्या 7 व्या दिवशी पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  यांच्या ठोस आश्वासनानंतर आमदार कैलास पाटील यांनी त्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाचा व शेतकऱ्यांच्या पीकविमा, सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान संदर्भामध्ये खालील मागण्या संदर्भात ठोस आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण तात्पुरते  मागे घेण्यात आले.  
1. खरीप हंगाम 2020 ची जिल्हा प्रशासनाने उपोषणापुर्वी लावलेल्या यादीमध्ये एकुण 169086 एवढे शेतकरी पात्र दाखवले होते उपोषणानंतर 184413 एवढे नव्याने शेतकरी वाढले असून 353499 एवढी शेतकरी संख्या झाली आहे. उपोषणामुळे शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे व वाढ झालेल्या पात्र शेतकऱ्यांची याद्या प्रशासनामार्फत प्रत्येक गावात प्रसिध्द करण्यात आल्या त्यामुळे सुधारित यादीप्रमाणे विमा मिळणार हा शेतकऱ्यांना विश्वास बसला आहे हे उपोषणाचे यश आहे. 18 हजार हेक्टर प्रमाण विमा मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले. 2020 च्या पिकविम्याची रक्कम 347 कोटी ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विमा कंपनी देण्यास टाळाटाळ करत असल्याने विमा कंपनीवर RRC अंतर्गत महसुल वसुलीची कार्यवाही करणेबाबत जिल्हाधिकारी पुणे यांना कळविले आहे. एवढे करुनही बजाज अलायंन्स कंपनी विमा देण्यास टाळाटाळ करत असल्यास जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात सदर कंपनीची सर्व बँक खाती सीझ करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले. या उपोषणामुळे देशात प्रथमताच एखाद्या पीकविमा कंपनीवर RRC अंतर्गत मालमत्ता जप्तीची व विमा कंपनीची सर्व बँक खाती सीझ होणार आहेत. उपोषणातील प्रमुख मागणी व याबाबत प्रशासनाने विमा कंपनीवर केलेली कारवाई हे या उपोषणाचे प्रमुख यश आहे. तसेच परांडा येथील विमा भरलेल्यापैकी 35 हजार 958 पैकी पात्र 3 हजार 163 एवढे शेतकरी यादीमध्ये समाविष्ठ आहेत उर्वरित 32 हजार 795 शेतकरी तसेच विमा कंपनी पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ऑफलाईन विमा भरलेले 1 हजार 700 शेतकऱ्यांच्या बाबतीत प्राधान्याने विचार होणार असल्याचे तसेच यापुर्वी जे 201 कोटी रक्कम प्राप्त झाली आहे ती रक्कम एकुण 3 लाख 53 हजार 499 एवढ्या पात्र शेतकऱ्यांना समप्रमाणात वाटप होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले. पूर्वीविमा भरलेल्या वा याद्या लावलेल्या क्षेत्रात तफावत होती. त्यामुळे समान वाटप होणे शक्य न्हवत.  त्यानंतर उर्वरित रक्कम विमा कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाटप होणार आहे.



2. 2021 खरीप हंगाम पीकविम्याचे उर्वरित 50 टक्के म्हणजेच 388 कोटी एवढी रक्कम पात्र शेतकऱ्यांना देण्याबाबत विमा कंपनीने टाळाटाळ केल्यास विमा कंपनीवर राज्य सरकार तर्फे दबाव आणुन तसेच कोणतीही जुजबी (188) कार्यवाही न करता सदरची रक्कम वसूल करणेबाबत ठोस कारवाई करुन व वेळप्रसंगी प्रशासन विमा कंपनीच्या विरोधात देखील न्यायालयीन लढा देईल व सदरची 388 कोटी रक्कम वसून करणेबाबत कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले.
3. सन 2022 खरीप हंगामाची अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली 59 कोटी रक्कमेच्या संदर्भात उद्या संध्याकाळपर्यंत शासन निर्णय काढणार असल्याचे उपोषण मागे घेताना उपसचिव श्री. धारुरकर व सचिव श्री. आसिम गुप्ता यांनी मान्य केल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगतले. 
4. सन 2022 मधील सततच्या पावसाने नुकसान झालेली नुकसान भरपाईची 222.73 कोटी रक्कम मंगळवारी किंवा बुधवारी होणाऱ्या उपसमितीच्या बैठकीमध्ये यावर निर्णय घेवुन 3 दिवसात मदत दिली जाईल असे आश्वासन दिले आहे. 
(धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020 सोयाबीन पीकविमा शेतकऱ्यांची तालुकानिहाय संख्या)
  आजच्या उपोषणाच्या 7 व्या दिवशी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. श्री. अंबादासजी दानवे साहेब यांनी भेट घेवून कार्यकर्त्यांस मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या व जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत नारळपाणी घेवून उपोषण तात्पुरते स्थगित केले असल्याची घोषणा केली. 
सर्व शेतकरी, शिवसैनिक, कार्यकर्ते, व्यापा री, पत्रकार बांधव, विद्यार्थी, सर्व नागरिक, विविध पक्षाचे कार्यकर्ते, शेतकरी संघटना, इतर सामाजिक संघटना, यांनी या आंदोलनाला मोठा पाठिंबा दिला म्हणुन हे आंदोलन यशस्वीरित्या पार पडले त्याबद्दल सर्वांचे मन:पुर्वक आभार.

 “मागील 3 वर्षांपासून  निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कायम अडचणीत होता. त्याला मदतीची गरज होती. त्यात विमा कंपनी वा सरकारकडून मदत मिळत न्हवती. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा विश्वास निर्माण झाला आहे. "त्यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होतील असा विश्वास वाटतो शेतकऱ्यांना आव्हान करतो की, आपण आत्महत्येचा मार्ग अवलंबू  नका. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. अशी प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top