उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी जुगार विरोधी कारवाई
वाशी पोलीस ठाणे : जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीस ठाण्याच्या पथकाने काल दि. 21.10.2022 रोजी दोन ठिकाणी छापे टाकले. यात वाशी ग्रामस्थ- बिभीषण पांडुरंग कवडे हे 11.30 वा. सु. वाशी येथील इंदापूर रस्त्यालगत एका पत्रा शेडसमोर मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 530 ₹ रोख रक्कम बाळगलेले, तर वाशी येथील- सुरेश शंकर चव्हाण हे 13.00 वा. सु. वाशी येथील पारा रस्त्यालगत कल्याण मटका जुगार साहित्यासह 760 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना आढळले.
उमरगा पोलीस ठाणे : बलसुर, ता. उमरगा येथील- अमजद मुसीब सत्तार हे दि. 21.10.2022 रोजी 11.30 वा. सु. गावातील चांदणी चौकात कल्याण व टाईम बाजार मटका जुगार साहित्यासह 1,030 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.
भुम पोलीस ठाणे : पाथ्रुड, ता. भुम येथील- दत्तात्रय सुर्यभान भसाड हे दि. 21.10.2022 रोजी 15.25 वा. सु. गावातील बस स्थानकाजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 530 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.
तामलवाडी पोलीस ठाणे : सावरगाव, तुळजापूर येथील- शंकर राजेंद्र पवार हे दि. 21.10.2022 रोजी 18.45 वा. सु. गावातील बस स्थानकाजवळील जगदंब पान शॉप समोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 280 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना तामलवाडी पो.ठा. च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.