google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 येणारया निवडणुकांत विरोधकांना भुईसपाट करू - आरोग्यमंत्री तानाजी सावंत

येणारया निवडणुकांत विरोधकांना भुईसपाट करू - आरोग्यमंत्री तानाजी सावंत

0

*सोलापूर जिल्ह्य़ातील उरलीसुरली शिवसेना शिंदे गटात सामील

*सर्वसामान्यांचे हे सरकार सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास  करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  *येणारया निवडणुकांत विरोधकांना भुईसपाट करू - आरोग्यमंत्री सावंत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) 
           राज्यात सत्तातंर केल्या नंतर खरया अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार आले आहे. हे सरकार सर्वांगीण विकासा बरोबरच बाळासाहेबाच्या हिंदूत्वाचा विचार घेऊन जाणारे आहे, त्यामुळेच आता राज्यातून उरलीसुरली शिवसेना आमच्यावर विश्वास ठेऊन आमच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
     मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित भव्य प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आरोग्‍यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. 
    सोलापूर जिल्ह्य़ातील अक्कलकोट, माढा,या तालुक्यातील शिवसैनिक तसेच राष्ट्रवादीचे नेते यांनी आरोग्यमंत्री सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. यात तालुकाप्रमुख, शहर प्रमुख, माजी नगरसेवक, नगरसेवकी आणी प्रमुख पदाधिकारयांनी यावेळी प्रवेश केला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राज्यातून सध्या बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संपर्क सुरू आहे. मागील चार महिन्यांच्या सरकरच्या कामगिरीवर सर्वसामान्य जनतेतून विश्वास व्यक्त केला जातोय , राज्याच्या सर्वांगीण विकासा करिता संपूर्ण मंत्रीमंडळ हे दिवसरात्र मंत्रालयात बसून, ग्रामीण भागात भेटी देऊन काम करत आहे. अडीच वर्षांच्या अनुशेष आम्ही दिवसरात्र काम करून भरून काढत आहोत,  आणि राज्याला एका ऊंचीवर नेण्याचे काम करत आहोत. त्यामुळेच आमच्या कारभारावर सर्वसामान्य जनता विश्वास ठेवून आमच्या सोबत येत आहे, आणी हीच आमच्या कामाची पावती असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. 
     येणारया काळात आम्ही आमच्या कामातूनच शेतकरी,शेतमजूर, वंचित, उपेक्षित घटकांसाठी काम करून राज्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा विश्वास यावेळी उपस्थितीतांना दिला. 
   सोलापूर, उस्मानाबाद, यासह मराठवाडय़ातील उरलीसुरली शिवसेना तसेच राष्ट्रवादी आता आमच्या सोबत आहे, आम्ही केलेले काम हे सर्वसामान्यांना केंद्रित करून केले असल्याने आमच्यावर विश्वास ठेवून बाळासाहेबांच्या शिवसेनेत आता कार्यकर्ते सामील होत असल्याचे आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्य़ात तर शिवसेना संपूर्णपणानी आमच्या सोबत आहे तर राष्ट्रवादीला भगदाड पडू लागले आहेत. सर्वसामान्यांचा विश्वासघात मागील सरकारने केल्याने आता प्रत्येकांची भावना आणी विश्वास शिंदे-फडणवीस सरकारवर आहे.
     सरकारची कामगिरी ही अल्पावधीतच जनतेसमोर येत असल्याने विरोधकात पोटशूळ उठला असल्याचे आरोग्यमंत्री सावंत यांनी सांगून येणारया सर्व निवडणुकीत विरोधाकांना भुईसपाट केल्याशिवाय जनता राहणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
या प्रवेश कार्यक्रमात अक्कलकोटचे तालुकाप्रमुख संजय देशमुख, शहर प्रमुख योगेश पवार , वर्षा चव्हाण, ताराबाई कुंभार,विनोद मदने,उमेश पांढरे,बसवराज बिराजदार, चंद्रकांत वेदपाठक, खंडू कलाल,सिध्दराम जाधव, रवी गायकवाड, रवी नारायणकर,मुकुंद दळवी,सागर कदम,गंगाधर मुरटे,पुष्कर सलगरकर,मनिष काळजे,सागर शितोळे,जावेद विजापुरे,बाळासाहेब मोरे,यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top