उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाचा मुख्य रस्ता सुरू करा - भीमनिर्णायक युवा समूह
उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रूग्णालय उस्मानाबाद येथिल मुख्य प्रवेशद्वार एक महिन्यापासुन रस्ता दुरूस्तीच्या कारणाखाली बंद आहे तो तात्काळ दुरूस्त करून लोकांसाठी खुला करावा. सदरील विषयी निवेदन भीमनिर्णायक युवा समूहाच्या वतीने देण्यात आले.
उस्मानाबाद जिल्हा वैद्यकिय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रूग्णालय उस्मानाबाद येथिल मुख्य प्रवेशद्वार एक महिन्यापासुन रस्ता दुरूस्तीच्या कारणाखाली बंद आहे. रस्ता कच्चा असल्याने व मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठ मोठे दगड टाकुन अडथळा केला आहे.
रस्ता दुरूस्त नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अतिदक्षता विभाग खुप आतमध्ये असल्याने रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे रूग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तात्काळ हा रस्ता दुरूस्त करून मुख्य जुने प्रवेशद्वार तात्काळ सुरू करावे अन्यथा भीमनिर्णायक युवा समुह,बहुजन विद्यार्थि समाज सेवा मंडळ तसेच नागरिकांच्या वतिने तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची नोंद प्रशासनाने घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
व सदरील निवेदन अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना देण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. उदयकुमार यांनी निवेदन स्वीकारले .
सदरील निवेदनावर सचिन दिलपाक संस्थापक अध्यक्ष भीमनिर्णायक युवा, नंदकुमार हावळे (बहुजन विद्याार्थि समाज सेवा मंडळ),वंचित पक्षाचे युवा नेते आनंद गाडे , रिपब्लिकन सेनेचे गौतम बनसोडे , भीमनिर्णायक युवा समूहाचे दादासाहेब गायकवाड . आदींची निवेदनावर स्वाक्षरी आहे .