१२ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद मध्ये लोकअदालतीचे आयोजन
उस्मानाबाद,दि.11 (जिमाक):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण ,दिल्ली आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे उस्मानाबाद मध्ये 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत अयोजित केली आहे.
न्यायालयीन प्रलंबित तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये झटपट न्यायनिर्णय व्हावेत,या उद्देशाने येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने दि.12 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा न्यायालय उस्मानाबाद येथे व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे.
या लोक अदालतीमध्ये दिवाणी प्रकरणे,तडजोडपात्र फौजदारी खटले,मोटार अपघात प्रकरणे,कौटुंबिक वाद प्रकरणे,धनादेशाचे प्रकरणे,जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग उस्मानाबाद येथील तडजोडीस पात्र प्रलंबीत प्रकरणे तसेच मोटारवाहन भंगाची वाहतूक शाखेची दाखल पूर्व प्रकरणे समेटासाठी पक्षकारांनी पुढे यावे व लोक अदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती अंजू एस. शेडे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांनी केले आहे.