अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0


अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Osmanabad : स्थानिक गुन्हे शाखा : मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 12.11.2022 रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथक तुळजापूर शहरात गेले असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि,( tuljapur ) तुळजापूर येथील घाटशीळ वाहन पार्कींग जवळ असलेल्या भक्त निवास & लॉज येथे लॉज चालक- व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत.


 यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर 17.30 वा. सु. छापा टाकला असता लॉजच्या दोन खोल्यांमध्ये 2 प्रौढ महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक दोन पुरुष असून (नाव- गाव गोपनीय) ते त्या 2 महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करुन त्यांच्यावरती उपजिवीका करीत असल्याचे समजले. यावर पथकाने त्या लॉज चालक दोन्ही पुरुषांस ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल फोन व 2,300 ₹ रोख रक्कम असा माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या दोन्ही महिलांची सुटका करुन लॉज चालक दोन्ही पुरुषांविरुध्द भा.दं.सं. कलम- 370, 370 अ (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4 , 5 अंतर्गत तुळजापूर पोलीस ठाण्यात काल दि. 12.11.2022 रोजी गुन्हा नोंदवला आहे.


            सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि- श्री. यशवंत जाधव, सपोनि- मनोज निलंगेकर, तुळजापूर पो.ठा. चे सपोनि- श्री. सुशिल चव्हाण, स्था.गु.शा. चे पोलीस अंमलदार- जावेद काझी, उलीउल्ला काझी, प्रकाश औताडे, दिलीप जगदाळे, सुभाष चौरे, धनंजय कवडे, शौकत पठाण, शैला टेळे, वैशाली सोनवणे, रंजना होळकर, बलदेव ठाकुर यांच्या पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top